नांदेड| येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दुसऱ्या आरोपीलाही नांदेड पोलिसांना ताब्यात घेतले असून, हा आरोपी अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

नांदेडचे प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची शारदानगर येथील घराबाहेर दि.5 एप्रिल 2022 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बियाणी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे कुख्यात गुंड हरविंदर सिंग उर्फ रिंदा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बियाणी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठ्या व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी स्थलांतराची तयारी देखील केली होती.

SIT ने या प्रकरणी आतापर्यंत 17 जणांना बेड्या ठोकल्या. पण संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारे 2 जण अद्याप पोलिसांच्या हाती लागले नव्हते. यातील एका शूटरला गत महिन्यात अटक करण्यात आली होती. त्याला नांदेड पोलिसांनी चंदिगड तुरुंगातून 11 सप्टेंबर रोजी नांदेडला आणले असून, सध्या तो कारागृहात आहे. त्यानंतर गुरुवारी दुसऱ्या शूटरलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.

संजय बियाणी यांच्यावर हरविंदर सिंग रिंदा याच्या सांगण्यावरुन गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार करणाऱ्या 2 शूटरपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर दुसरा प्रमुख शूटर दीपक सुरेश रांगा फरार झाला होता. त्याच्या शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. तो अनेक राज्यांत शोध घेऊनही पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पण 25 जानेवारी रोजी एनआयएच्या पथकाने नेपाळ बॉर्डरवरुन त्याला अटक केली. NIA ने पकडलेल्या दीपक सुरेश रांगा विरोधात विविध राज्यांत तब्बल 25 गुन्हे दाखल आहेत. त्यात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा समावेश असून आता महाराष्ट्रातही त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. रांगा याने पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या हेडक्वॉर्टरवर रॉकेट हल्ला केला होता.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version