माहूर/नांदेड| साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावरील श्री रेणुका देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला दि. १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. उत्सव काळात मंदिराच्या पायऱ्यांवर दिवे, कापूर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. एरवी सकाळी ६ ते रात्री साडे आठ पर्यंत दर्शन घेता येते. पण उत्सव काळात पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. दहा दिवसांत दहा लाखांवर भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज मंदिर संस्थानने व्यक्त केला आहे.

नियोजनच्या दृष्टीने सहायक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. यात विविध विभागाकडून नवरात्रोत्सवासाठी केलेल्या तयारीचा विभागवार आढावा घेतला. आणि आवश्यक असलेल्या सूचना दिल्या. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रेणुका देवी संस्थानने भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांना मुखदर्शनासाठी मोठ्या एलसीडीची व्यवस्था केली आहे.

तसेच नऊ दिवस महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, अशी माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कानव, व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली. नगरपंचायत कार्यालयाने वाहनतळ, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, तर नऊ दिवस २४ तासांकरिता नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड यांनी दिली.

शंभर बसेस उपलब्ध नवरात्रोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळ शंभर बसेस उपलब्ध करून देणार आहे. उत्सव काळात पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनाकरता मंदिर खुले राहणार आहे. तसेच पंचमी व सुटीच्या दिवशी भाविकांची गर्दी लक्षात घेता वेळ वाढवून देण्यात येणार आहे, असे मंदिर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version