नांदेड| कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सांदिपानी पब्लिक स्कूल मध्ये सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ७६ व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमांतर्गत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील व परिसरातील कवी कवयित्रींनी व गायकांनी सहभागी होत हिंदी मराठी गाण्यांची अविस्मरणीय बरसात केली. महागायक मोहम्मद रफी यांचे चाहते शंकर धोंगडे यांनी रसिकांना ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध केले. येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कथाकथन आणि कविसंमेलन बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.‌

कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कथाकार दिगांबर कदम होते तर सुप्रसिद्ध कथाकार तथा पत्रकार राम तरटे यांच्या कथाकथन सादरकरणाने चांगलीच रंगत आणली. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, सांदिपानी पब्लिक स्कूलचे संचालक सूनिल राठोड, काव्यपौर्णिमेचे संकल्पनक प्रज्ञाधर ढवळे सप्तरंगी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष शंकर गच्चे, महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे वैद्य आदींची उपस्थिती होती.

शहरातील मूळगाव तरोडा बु‌. परिसरातील सांदिपानी पब्लिक स्कूल येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने कथाकथन आणि काव्यपौर्णिमा कार्यक्रमांतर्गत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या या ७६ व्या काव्यपौर्णिमेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रल्हाद घोरबांड हे होते. शरदीय चांदण्याच्या चंद्रप्रकाशात मंगलमय आश्विन पौर्णिमेचा दुग्धशर्करा योग प्राशन करीत ज्येष्ठ कवी एन. सी. भंडारे, शरदचंद्र हयातनगरकर, थोरात बंधू, नागनाथ मामिलवाड, डी. एन. मोरे खैरकेकर, नागोराव डोंगरे, रुपाली वागरे वैद्य, चंद्रकांत कदम यांनी एकापेक्षा एक सरस आणि दमदार कविता सादर करीत रंगत आणली तर पंचफुला वाघमारे, प्रज्ञाधर ढवळे, मंजुषा देशमुख, शंकर धोंगडे, सुनील राठोड पुंडलिक इंगळे, संगीत शिक्षक दया सर, अरविंद काळेवार, निशिगंधा ढवळे, साहेबराव कांबळे, सुधीर बैनोदे, नागेश हिंगोले यांनी हिंदी मराठी गाण्यांची संगीतमय कोजागिरी जागविली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कथाकथन आणि कविसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. काव्यपौर्णिमेचे अध्यक्ष प्रल्हाद घोरबांड यांनी अध्यक्षीय समारोप केला. सर्वांना पुलाव आणि केशरयुक्त मसाले दूध देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. दरम्यान, मराठी मायबोली परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव अंबुलगेकर आणि साहित्यिक तथा वाजेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. कथाकथन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश हिंगोले केले यांनी तर काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र प्रज्ञाधर ढवळे यांनी हाती घेतले होते. आभार सप्तरंगी साहित्य मंडळाचे शंकर गच्चे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांदिपानी पब्लिक स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version