सांगा नेत्यांनो, आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी शेवटचे नोटाचेच बटण दाबायचे का?-डॉ.हंसराज वैद्य
नांदेड। आज शहरातील झोपड पट्टीतील व ग्रामिण भागातील दरेगाव, लोण, मुगट, आमदूरा, मेंडका, हिप्परगा, पिंपळ कौठा, कामळज, चिलपिंपरी, कोल्हा अदि गावातून ज्येष्ठ नागरिकांनी आजच्या बैठकीला गर्दी केली होती. ज्येष्ठ नागरिक जागृती मोहिमेअंतर्गत बैठकित ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक नेते समाज भूषण डॉ.हंसराज वैद्य बोलत होते.
मार्गदर्शन करत असताना ते पुढे म्हणाले, माझ्या ज्येष्ठ आज्या-आजोबांनों तथा मित्रांनो, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक वयाच्या साठ वर्षापर्यंत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासह कुटूंबासाठी, समाजासाठी व पर्यायाने राष्ट्रनिर्मितीसाठी राबराब राबलो. प्रत्येक सार्वत्रिक निवडणूकांत तथा राष्ट्रीय कार्यक्रमांत आपण शंभर टक्के सहभाग नोंदविला. थकलो नाहित. दमलो नाहीत. थांबलो नाहित. क्षणभराचीही उसंत घेतली नाही. मुलं मोठी झाली. त्यांची लग्न केली. त्यांच्यासाठी ईमले ऊभे केले. झिजत राहिलो. आता मात्र आंगात त्राण राहिलेले नाही.
कारभार मुलाच्या व सुनबाईच्या हातात सुपूर्द केलेला आहे. होतं नव्हतं तेवढं शून्यातून विश्व निर्माण करण्यात खर्ची घातल. कुडूक मुडूकही भविषाची तथा म्हातार पणाची काठी होतील म्हणून मुलानांच सर्व कांही देऊन टाकलं. त्यांनी स्वतःचे संसार थाटले.नातीं नातूं झाले.मुलं मुलीं आपापली पोटं भरण्यात व त्यांच्या संसारात गर्क झाली. वयोमाना प्रमाणे आपलं शरिरही विविध लहान मोठ्या आजारांचं माहेर घर बणलं आहे. दृष्टी,श्रवण यंत्रणा, पचन यंत्रणा, तथा शरिराचे सर्वच आवजार कमजोर झालेले आहेत. शरिर कमजोर झालं म्हणून कुठं कामावर जाता येत नाही.काम मिळत नाही म्हणून दामही मिळत नाही.मुलाच्या व सुनेच्या धाकामुळे भिक मागायलाही जाता येत नाही.त्यामुळे आपली चहू बाजूनी मुस्कट दाबी होते आहे.
जिल्हा परिषद-पंचायत समितीचे सदस्य व सभापती, आमदार, खासदार, पालक मंत्री, उपमुख्य तथा मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री, प्रधान मंत्री तथा राष्ट्रपती कोणीही सहानुभूतिने ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा, कथा तथा वास्तव अवस्था अस्थेने जाणून घेऊन त्या सोडवून देण्याची तस्दी घेत नाहीत. एकदा का निवडणूक झाली की पाच वर्ष कुणीही मतदार राजाकडे (आपल्याकडे) ढुंकूणही पहायला तयार नाहीत ही वस्तूस्थिती आहे! सत्तेतील व सत्तेबाहेरील राजकीय नेते तथा पक्षांनाही ज्येष्ठ नागरिकांचे महत्व नाही. नेहमीच आपल्याला गृहित धरल्या जाते. आपण एकून जन संख्येच्या 18 टक्के इतके असून प्रत्येक कुटूंबात किमान एक ते चार (आई,बाबा, आजोबा,आजी) जनआहोत.एक ज्येष्ठ नागरिक हा सहा मतांचा (स्वतः,पत्नी,मुलगा,सुन, मुलगी तथ जावाईंं) राजा आहे.
एवढेच नाही तर तो एकटा वस्त्याच्या वस्त्या,गल्यांच्या गल्याच नाही, तर गावंच्या गाव तो वळवू शकतो.एकाद्या उमेद्वाराला तो निवडूनही आणू शकतो तथा घरी ही पाठवू शकतो. आता ही लोकसभेची निवडणूक अति महत्वाची आहे. जग भारताकडे उद्याची महाशक्ती म्हणून पहाते आहे. भारताला मोदीजींच्या रूपाणे एक दूरदृष्ठा, जागरूक, सजग, कणखर, दूर्मिळ, आतार पुरूष तथा नेता मिळाला आहे.! त्यांच्या निवडीची निवडणूक म्हणून आख्ख जग या निवणूकी कडे बघत आहे! त्यांच्या पुनःश्च पंतप्रधान म्हणून निवडीची ही निवडणूक आहे.
भारतातल्या मोदीजींच्या अनुयायाचा व त्यांच्या चाहत्या मतदारांचा आता खर्या अर्थाने “कस” लागणार आहे. पण त्यांचे अनुयायी तेवढ्या गांभीर्याने ही निवडणू घेताना दिसत नाहीत. त्यांच्या “सत्यभामा रूपी अनुयायांनां तुळशीपात्र रूपी ज्येष्ठ नागरिकांची” किंमत कळल्याचे दिसत नाही.! सत्तेतील राजकारण्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची जाणीव, गांभिर्य कळले नाही तर ज्येष्ठ नागरिकांनां नाईलाजाने शेवटचे नोटाचे बटण दाबून आपली नापसंती नोंदवावी लागेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत डॉ.हंसराज वैद्य यांनी व्यक्त केली.