त्वचा रोग निदान व उपचार शिबीरात १५० दिव्यांगांवर उपचार
नांदेड। भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडी व प्रदेश केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्ठच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच कर्णबधीर सांकेतिक भाषा दिनाचे औचीत्य साधत शनिवार दि २३ सप्टेबर रोजी मगनपुरा भागातील मालपाणी विद्यालयात त्वचारोग निदान, उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर. आर. मालपाणी मतिमंद व श्रीरामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाच्या तब्बल १५० दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी व उपचार करण्यात आले आहे.
त्वचा रोग निदान व उपचार शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर कोकरे तसेच दिपक कोठारी, अशोक गंजेवार, राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. अर्चना बजाज, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दिपकसिह रावत, माजी नगरसेवक विनय सगर, समीर तम्मेवार, प्रणव मनुरवार, अमित शर्मा, मुख्याध्यापक नितिन निर्मल, लक्ष्मीकांत लोकमनवार आदींची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. शरद माने, डॉ. प्रल्हाद राठोड यांनी दोन्ही विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी, उपचारानंतर मान्यवरांच्या हस्ते औषधाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मन क्षीरसागर यांनी केले. यावेळी दोन्ही शाळेच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहीक प्रयत्नांची गरज – निर्मल
विविध क्षेत्रात यश मिळवत दिव्यांगानेही आपण सामान्यांपेक्षा कमी नाही हे वेळोवेळी सिद्ध केले आहे. अनेक क्षेत्रात दिव्यांग बांधव उल्लेखनिय कामगिरी बजावत आहेत. काही मोजके नाही तर बहुतांश दिव्यांग बांधव आपआपल्या गुणवत्तेनुसार समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत यासाठी केवळ शासन नाही तर सामाजिक संघटना व आपण सर्व असे सामुहिक प्रयत्नाची गरज आहे. वैद्यकीय आघाडी व प्रदेश केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्ठच्या वतीने नेहमीच आम्हाला सहकार्य मिळाले आहे. असेच सहकार्य यापुढेही मिळेल अशी अपेक्षा मुख्याध्यापक नितिन निर्मल यांनी केली. राजस्थानी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दोनवेळा मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. येणाऱ्या ५, ६, ७ ऑक्टोबर रोजीचे शिबीर रौप्यमहोत्सवी शिबिरापुर्वीचे शिबीर असून आगामी मार्च महिन्यातील शिबीर हे रौप्यमहोत्सवी असल्याचीही माहिती निर्मल यांनी दिली आहे.