
श्रीक्षेञ माहूर| सध्या हिंगोली मतदारसंघाचं वातावरण चांगलं तापलं असून महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच चालू आहे. अशातच महायुतीचा उमेदवार स्पष्ट होण्याआधीच व शिंदेसेनेच्या उमेदवाराचा विरोध दाखवत भाजपाचे अध्यात्मिक आघाडी प्रमुख तथा ‘मिशन मोदी अगेन पीएम’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माहूर येथील योगी शाम भारती महाराज यांनी अखेर काल दि.३ एप्रील रोजी शक्ती प्रदर्शन करत शेकडो साधु-संताच्या व शिष्य मंडळीच्या उपस्थितीत हिंगोली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.परंतु योगी शाम भारती आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील का ? कि हिंगोली लोकसेभेच्या रिंगणात कायम राहतील ? यासह अनेक प्रश्न मतदार संघात उपस्थितीत होत आहे.
