दि.24 फेब्रुवारी पासून जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन….सकल मराठा समाज नांदेड

नांदेड| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी शासन हे सकारात्मक नसुन, मराठा समाजाच्या रीतसर कुणबी नोंदी मिळून सुद्धा सरकारने सगे सोयरे कायदा आमलात न आणता मराठा समाजाला कायद्यात न टिकणारं 50% च्या वरचं फसवं 10% टक्के आरक्षण देऊन समाजाची घोर फसवणूक केली आहे याची चिड सकल मराठा समाज बांधवामध्ये निर्माण झाली असुन सगे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या दि.24 फेब्रुवारी पासून जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं म्हणजेच ओबीसी मधुन आरक्षण हे मिळू शकते तशा शासकीय नोंदी सुद्धा सापडल्या असुन सरकार मात्र ओबीसी नेत्यांना सकारात्मक प्रतिसात देत मराठा समाजाची थट्टा करतेय, 27 जानेवारी रोजी लेखी दिलेल्या अधिसूचनेचे उल्लंघन करीत त्यातील एकही मागणी सरकारने मान्य केली नसुन केवळ आणि केवळ मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे सरकार करतंय यात शंका नाही. मराठा समाजाला दिलेले 10% आरक्षण हे समाज नाकारत नसून उर्वरित मराठ्यांना ते हिताचे जरी असले तरी ज्यांच्या कुणबी नोंदी ह्या शासकीय दप्तरात आहेत त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सगे सोयरे कायद्याची अंमलबाजणी होणे आवश्यक आहे जोपर्यंत ती होणार नाही तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
सदरील आंदोलने हे विविध ठिकाणी शांततेत पार पडतील. कुणीही जाळपोळ किंवा तोडफोड करणार नाही. जरांगे पाटील यांनी ठरवून दिलेल्या वेळेतच ही आंदोलने होतील. शांततेत आणि संविधानिक रित्या चालु असणाऱ्या आंदोलनाला कुठेही गालबोट लागणार नाही किंवा अशा आंदोलनाला पोलीस प्रशासनाने सुद्धा दबाव निर्माण करून मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नये. आंदोलकांनी गरजु, रुग्ण, वयोवृद्ध, ऍम्ब्युलन्स, महावितरण सारख्या अतिआवश्यक दळणवळण करणाऱ्या वाहनाना व दहावी बारावी च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन सुद्धा नांदेड जिल्हा मराठा समन्वयक मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी केले.
उद्या पासून सुरु होणाऱ्या बेमुदत रास्ता रोको आंदोलनाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात सकल मराठा समाज बांधवांच्या प्रतिनिधीची बैठक बोलावण्यात आली होती व सदरील बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नांदेड जिल्ह्यातील अनेक समाज बांधव उपस्थित होते.
उद्यापासून होणाऱ्या रस्तारोको आंदोलनात तात्पुरता बदल
दि.24 पासून रोज सतत 3 मार्च पर्यंत होणारे रस्तारोको आंदोलन हे शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या परीक्षा लक्षात घेऊन फक्त एक दिवशीय रास्ता रोको आंदोलन होणार. पुढील आंदोलनाची दिशा ही 25 फेब्रुवारी रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक घेऊन जरांगे पाटील ठरतील.रविवारच्या बैठकीचे आमंत्रण हे राज्यातील सर्व मराठा समाजाला.सर्वांनी एकत्र येऊन दिशा ठरवू असा जरांगे पाटलाचा तातडीचा आदेश आहे. नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवानी उद्या फक्त एक दिवस सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत राज्यभर रास्ता रोको आंदोलन हे शांततेत पार पाडावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
