हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

हिमायतनगर| शहरात धम्मचक्र प्रर्वतनदिनाच्या निमित्ताने येथील बौद्ध अनुयायांनी शहरातील मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह पंचरंगी ध्वज असलेल्या वाहनांची डीजेच्या तालावर भव्य शोभा यात्रा काढली होती.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाजबांधवानी येथील नालंदा बौद्ध विहारांमध्ये अनेक उपासक-उपासिकांनी त्रिशरन पंचशिल गृहन करुन ध्वाजारोहन केले. आणि एक दुसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभकामना दिल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढली. दुपारी १२ वाजता निघालेली शोभा यात्रा शहरातील ठिकठिकाणच्या चौकात येताच अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

यात मोठ्या प्रमाणात बालक, युवक, युवतींनी मिरवणुकीत सामील होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. शहरातील परमेश्वर मंदिर मैदानात येताच फुलांची उधळण करत मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी युवकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. या मिरवणुकीत शेकडो महिलां – पुसरुषांसह युवकांनी सहभाग घेतला. मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!