हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्य चिकित्सक भोसीकर यांची भेट

हिमायतनगर। येथील ग्रामीण रुग्णालयास नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या झिने मॅडम यांनी अचानक भेट ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची व रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच येथील रुग्णसेवा देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या कामाबदल समाधान व्यक्त केले.
प्रथमतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.रुग्णांना आवश्यकतेनुसार गरजू रुग्णांच्या सेवा देणारे येथील डॉ.विकास वानखेडे यांची ग्रामीण रुग्णालयांत नियमीत वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू करण्यात आले. या नित्यक्तीबद्दल डॉ भोसीकर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाकाजाचा आढावा घेतला. एव्हढेच नाहीतर नव्याने सुरू असलेल्या हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केली.
यावेळी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विकास जाधव यांना गोरगरीब रुग्णांना देण्यात येणाऱ्या रुग्णसेवे बाबत दक्ष राहून सेवा देण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत सामान्य रुग्णालय नांदेड येथील डॉ.विद्या झिने मॅडम (आर. एम. ओ.), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संदेश पोहरे, डॉ.विकास वानखेडे, डॉ.शिल्पा जाधव, डॉ. किसवे, पंडित सीनकर सहाय्यक अधीक्षक, सतीश भरांडे, रुपाली मेश्राम, रमेश धांडे पाटील यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
