अप्रतिम ..अभूतपूर्व… अविस्मरणीय भक्तिमय सोहळा…..नांदेडकरांनी अनुभवला

नांदेड। नांदेड शहरात जागतिक किर्तीच्या आध्यात्मिक प्रवक्त्या जया किशोरीजी यांच्या श्री कृष्ण कथा व श्री राम कथा सत्संग संगीताच्या भक्तीमय वातावरणात पार पडला..एक अविस्मरणीय… अप्रतिम ..अभूतपूर्व धार्मिक सोहळा प्रबोधनात्मक.. आनंदी ..उत्साही … सुख-दुःख ..असे जीवनानुभव सांगणारा होता… हा सोहळा नांदेडकरांना भक्ती आनंद द्विगुणित करणारा होता.
जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नियोजन भारी असते .लोहा कंधार तालुक्यातील जनतेनी ते अनेकदा अनुभवले आहे.मागील पाच वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे नीटनेटके नियोजन असो की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अवघ्या पाच दिवसात यशस्वी व केंद्रीय गृहमंत्री याना प्रभावित करणारी जाहीर सभा असो त्याची जिल्ह्यात व पक्षीय पातळीवर नेहमीच जोरदार चर्चा होत असते.
कार्यक्रम छोटा असो की मोठा त्याचे नियोजन . त्यातील बारकावे ..त्याची अंमलबजावणी करणे व कार्यक्रम यशस्वी झाल्या नंतर आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे त्याचे श्रेय त्यांनाच देणे ही प्रतापरावांची खासियत होय.. म्हणून सहकार्यांना नेहमीच नवीन ऊर्जा देत असते. जागतिक कीर्तीच्या आध्यात्मिक प्रवक्त्या , जया किशोरी यांच्या दोन दिवसांचा भक्तिमय सोहळा नांदेडकरांनी अनुभवला.तो युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर व प्राणिताताई देवरे या बहीण -भावाच्या नियोजनाचा अजोड नमुना होता.
श्रीराम कथा व श्रीकृष्ण कथा सत्संग श्रवण करण्यासाठी नांदेडकरांची प्रचंड गर्दी होतीच शिवाय जिल्हा व मराठवाड्यातुन त्याचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या धार्मिक सोहळ्याचे उद्घाटन झाले.जवळपास दोन -अडीच दशका नंतर चिखलीकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात अशोकरावांच्या उपस्थिती लाभली. दोन्ही नेत्यांचे एकाच मंचावरून विचार ऐकण्याची संधी या निमित्ताने जिल्हा वासीयांना मिळाली. चव्हाण व चिखलीकर परिवारांचे कौटुंबिक ऋणानुबंध होते.पण पुढे बराच काळ कटुता वाढली . पण भाजपा पक्षामुळे जवळ आले. सत्संगाच्या निमित्ताने हे दोन्ही कुटुंब मनाने एकत्रित आल्याचे दिसले.
जया किशोरी यांच्या दोन दिवसीय ससत्संगाचा रोज पस्तीस ते चाळीस हजार हुन अधिक भक्तांनी लाभ घेतला असावा ..कार्यक्रम स्थानी आकर्षक स्टेज व ध्वनी व्यवस्था तर होतीच शिवाय जागेवर पाण्याची सोय केली होती.पार्कींग व्यवस्था अतिशय उत्तम होती. शेकडो कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे सत्संग सोहळा देखणा ठरला, नियोजन कसे करावे .कितीही भक्तगण वाढले तरी त्याची व्यवस्था तात्काळ कशी करावी लागते.
जेणेकरून सर्व भक्तगणांना या रसाळ वाणीच्या प्रबोधन ..भक्तिमय धार्मिक सोहळ्याचा जीवनानुभव घेता येईल याची खुद्द प्रतापराव व टीमने दक्षता घेतली. त्यामुळे नांदेडकरांना त्याच्या नियोजन पाहता आले त्याची तारीफ करण्याचा योग आला .पक्षीय भूमिकेच्या पुढे जाऊन या सोहळ्यात सर्वाना प्रतापरावांनी निमंत्रित केले .ही त्याच्या मोठ्या मनाची उंची होय.निख्खळ धार्मिक सोहळा साजरा करताना प्रवीण पाटील व प्राणिताताई देवरे यांनी केलेले सूक्ष्म नियोजन ” अप्रतिम होते.
प्रचंड ..उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा सहभाग ..प्रेम …पाहून प्रतापरावांना गहिवरून आले…!त्याचे सर्व सहकारी ..कार्यकर्ते याची साथ मिळाली. नांदेडकरांचे ऋण व्यक्त करताना येत्या काळात असेच प्रवचनकार ..सत्संग ठेवण्याचा मानस प्रतापरावांनी व्यक्त केला.अविस्मरणीय… अभूतपूर्व.. अप्रतीम सोहळा….नांदेडकरांच्या समरणात दीर्घकाळ राहील.
