
नवीन नांदेड। राजश्री पब्लिक स्कूल, लातूर रोड, नांदेड या शाळेची शैक्षणिक सहल दिनांक 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पार पडली. वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या, दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला,भद्रा मारुती मंदिर, घृष्णेश्वर मंदिर,शिर्डीचे साईबाबा मंदिर, शिवसृष्टी, साईतीर्थ व वेटअँडएन्जॉय वॉटर पार्क इत्यादी स्थळांना भेटी दिल्या.
संस्थेचे सचिव दिलीप पाटील, संचालिका डॉ.सौ.कल्पना पाटील, व्यवस्थापक सुशांत पाटील,माध्यमिक चे मुख्याध्यापक बी.के.फुले व प्राथमिक चे मुख्याध्यापक डी.ए.मुंढे सर यांच्या मार्गदर्शनानुसार सहलीचे उत्कृष्ट आयोजन काण्यात आले होते . शाळेचे व्यवस्थापक श्री. सुशांत पाटील हे स्वतः सहलीत सहभागी झाले होते. वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्या पाहत असताना त्यावरील अप्रतिम अशी कलाकारी पाहून विद्यार्थी अचंबित झाले.
दौलताबाद किल्ल्यावरील तोफा, भारत माता मंदिर, उंच मनोरा, भुलभुलय्या, मेंढी तोफ, दुर्गा तोफ ही दृश्य पाहत असताना विद्यार्थी शिक्षकांना ऐतिहासिक संदर्भ विचारून घेत होते तसेच भद्रा मारुती व घृष्णेश्वर यांचे दर्शन घेऊन ऐतिहासिक स्थळासोबतच अध्यात्मिक ज्ञानाचे महत्व विद्यार्थ्यांनी समजून घेतले. शिर्डी येथील साईबाबा चे दर्शन घेतल्यानंतर वेट अँड एन्जॉय वॉटर पार्क मध्ये विद्यार्थी अतिशय आनंदी झाले होते. सहल यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
