
उमरखेड, अरविंद ओझलवार। शहरातील असंख्य युवकांचा काँग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत व “हमारी भूल कमल का फुल” असे म्हणत काल भाजपमध्ये प्रवेश केलेल्यापैकी जुनी बाजार लाईन येथील युवकां सहित असंख्य युवकांचा शहर काँग्रेसमध्ये रीतसर प्रवेश झाला.
काल संध्याकाळी शहर काँग्रेसच्या कार्यालयात सदर प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शहर काँग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सर्व युवकांनी पुन्हः प्रवेश केला. शहरातील युवकांच्या प्रत्येक अडी अडचणीत आम्ही नेहमी साथ देतो. तसेच कोणत्याही युवकाची फसवणुक होवु देणार नाही अशी ग्वाही यावेळी गोपाल अग्रवाल यांनी दिली.
सदर प्रवेश युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष ईश्वर गोस्वामी यांच्या नेतृत्वात भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेणारे आकाश तामसकर, सतिष पुरी,आदित्य कुलथे , आकाश बोरकर, सोमनाथ शाहणे, अमोल लव्हांडे, दर्शन उदावंत, ओमंकार कुलथे, जयेश शर्मा, आबांदास शहाने, अरुण फाटे यांच्या सह आदि युवकांनी संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘हमारी भुल कमल का फुल’ अशी उद्घोषणा देत सर्व युवकांनी प्रवेश केला. यावेळी काँगसचे भय्या पवार , अभिषेक अग्रवाल , प्रकाश आर्य, मयुर उदावंत, आकाश श्रीवास्तव,अक्षय गोस्वामी, दर्शन भंडारी, नितिन शहाणे,पवन शाहणे, विकी उदावंत, प्रविण देशपांडे, प्रकाश वानखेडे, अभिषेक नाशिकर, शिवा जाधव, हर्षल नीलपत्रे, सईद भाई, प्रवीण देशपांडे, प्रकाश वानपत्रे अदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
