शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न न्याय भावनेने तथा सामोपचाराने हाताळावा-.डाॅ.हंसराज वैद्य
नांदेड| मराठा नेता मनोज जारंगे पाटील आईचा आशिर्वाद व पत्नी आणि मुला मुलीचा निरोप घेऊन मुंबई कडे निघाले आहेत.महाराष्ट्र शासनास तसा भरपूर कालावधी देऊनही मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न म्हणावे त्या पद्धतीने व गतिने राज्य शासन हातळताना दिसत नाही.गांभिर्याने घेताना दिसत नाही.
त्यातच स्वपक्षातलेही व विरोधी पक्षातलेही हित शत्रू मराठा आरक्षण प्रश्नाच्या आगित मूठभर कचरा आणि तेल टाकून या प्रश्नाला ज्यास्तित ज्यास्त जटिल तथा क्लिष्ट कसा करता येईल,या साठी आहोरात्र प्रयत्नशिल असताना दिसत आहेत.कांही मराठा संघटणा आम्हाला कांहिच का महत्व नाही? त्यात आमचे स्थान कुठे आहे?स्वार्था पोटी मग मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले तरी चालेल या भूमिकेत असतानां दिसत आहेत.प्रश्नाकडे पाठ पिरवितांना दिसत आहेत.पण त्यानां या पुढे समाजात कधिही व कुठेही स्थान मिळणार नाही.त्यांना समाजात कवडीमोल स्थान राहाणार आहे. समाज या मंडळीवर बारिक लक्ष ठेवून आहे.त्यातच जारंगे पाटलानी त्यांची चांगलीच पोल खोल केलेली आहे.
आज पर्यंत मराठा समाजाचे नेते म्हणून मिरविणारे राज कारणी,आजी-माजी आमदार-खासदार, जिल्हापरिषद, पंचायत समिमितिचे, स्थानिक स्वराज्य मतदार संघ संस्थांचे लोक प्रतिनिधीही या प्रश्नाकडे तिरायतच्या भूमिकेतून पहात असताना दिसत आहेत.खरेतर त्यांनी शासनावर दबाव आनण्या साठी राजनाम्याची तयारी दाखवून मनोज जारंगे पाटला बरोबर मुंबईस निघण्याची तयारी दाखवायला हवी आहे!आताच समाजात स्थान पुनर्स्थापण्याची त्यांना नामी संधी आहे असे माझे मत आहे.तसे जारंगे पाटलानीं सर्व मतभेद,गट तट,अंहम भाव,मान पाण सोडून तथा बाजूला ठेवून गरजवंत तथा उपेक्षित मराठा समाज बांधबासाठी एकत्र येण्याचे आवाहानच केलेले आहे.!मनोज जारंगे पाटलांनी मोठ्या मनाने कळ कळीची हाक दिलेली आहे.
*वारंवार विनंती करूनही शासनही या प्रश्नाकडे सहजतेने पाहातानां दिसत आहे.आजूनही वेळ गेलेली नाही.ही मराठा समाजाची मोठी व रास्त चळवळीतून मागणी आहे.शासनाने ही चळवळ दडपण्याचे निष्फळ प्रयत्न करण्यात वेळ घालऊ नये.बघ्याची भूमिका घेऊ नये.सहानुभूतीने,सामोपचाराने व न्याय भूमिकेतून हा प्रश्न हाताळावा व संभाव्य धोका टाळावा!या पेक्षा ज्यास्त हा प्रश्न चिघळू देऊ नये.मराठा समाज व इतर मागास वर्गीया मधिल एकोपा पूर्ववत कायम राहिल अशा पद्धतिने प्रश्न सोडवावा.