
नविन नांदेड़। येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस उप निरीक्षक आनंद बिचेवार यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबदल पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
आनंद बिचेवार यांनी नांदेड (सिडको) ग्रामीण पोलिस स्टेशन येथे कार्यरत असतांना ही बरेच गुन्हे उघड़किस आणले व वजीराबाद गुरन 160/2023 कलम 379 व इतर 51 मोटर साइकिलचे गुन्हे उघडकीस आनले आहेत व त्यातील 61 मो.सा. रिकव्हरी करून उत्कृष्ट कर्तव्य कामगिरी बजावून महाराष्ट्र पोलीस दलाच्या परंपरेत भर घातली या कामगिरी बदल आनंद बिचेवार पो.उप.नि. स्था गुशा. यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्थागुशा. पोलिस निरीक्षक खंडेराय व अधिकारी यांची उपस्तिति होती त्यांच्या या कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
