नांदेडलाईफस्टाईल

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेचे अर्ज अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी सादर करण्याचे आवाहन

नांदेड| केंद्रवती अर्थसंकल्प (न्यक्लिअस बजेट) योजना सन 2022-23 व 2023-24 वर्षाच्या गट अ निहाय या कार्यालयास प्राप्त निधीच्या, मंजूर प्रारूप आराखड्याच्या अधिन राहून वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज 4 जानेवारी पासून सकाळी 9.45 ते 19 जानेवारी 2024 रोजी सायं. 6.15 वाजेपर्यत नांदेड जिल्ह्यातून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे मागविण्यात आले आहे.

या योजनांची यादी व योजनानिहाय अर्ज प्रकल्प कार्यालय, किनवट येथील सेवायोजन कक्षात उपलब्ध आहेत. वैयक्तीक लाभाच्या योजना या अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 85 टक्के अनुदानावर ताडपत्री, फवारणी स्प्रे-पंप, तारकुंपन (काटेरी तार), बोअरवेल, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन, शेळी गट (3 शेळी व 1 बोकड) खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे व 100 टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) जमातीच्या लाभार्थ्यासाठी ताडपत्री, फवारणी, स्प्रे-पंप, तारकुंपन, बोअरवेल या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी सदर लाभार्थ्याकडे अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र, शेती विषयक योजनेसाठी सातबारा दाखला व योजनेच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

लाभार्थ्यांनी अर्ज केला म्हणजे त्यांना योजनेचा लाभ मिळेल असे नसून शासनाकडून प्राप्त झालेल्या लक्षांक, निधी व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता विचारात घेवून निवड समितीद्वारे लाभार्थी निवड करण्यात येईल. पात्र व ईच्छूक लाभार्थ्यांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!