सिडको परिसरसह ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक दुर्गा मंडळ यांनी केली ढोलताशांच्या व फटाक्यांच्या अतिबाजीत केली प्रतिष्ठापणा
नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दुर्गा महोत्सव सार्वजनिक मंडळ यांनी जय्यत तयारी केली असून सिडको परिसरात असलेल्या भगवान बालाजी मंदिर ३३ वा तर हडको भागातील बालाजी मंदीर येथे २१ ब्रम्होत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन १५ आक्टोबर पासून करण्यात आले असून दुर्गा महोत्सव निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्गा महोत्सव निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शहरी ३० व ग्रामीण दुर्गा महोत्सव २०अशा सार्वजनिक मंडळ यांनी ऑनलाईन नोदंणी केली असून अनेक मंडळानी नांदेड शहरासह लातूर, लोहा,अहमदपूर,विदर्भातील ऊमरखेड,यवतमाळ व परराज्यातील आंध्र प्रदेश,तेलंगणा येथुन दुर्गा माता मुर्ती आणल्या आहेत, रात्री उशिरा पर्यंत दुर्गा मुर्ती प्रतिष्ठापणा ढोलताशांच्या गजरात दांडिया गरबा खेळत महिलांचा व युवकाचा मोठ्या प्रमाणात मिरवणूक व्दारे वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये विधीवत पुजन करून केली आहे.
यात सिडको परिसरातील वैष्णवी दुर्गा महोत्सव मंडळ गुरूवार बाजार सिडको, श्री छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानी मंडळ सिडको,नवदुर्गा महोत्सव,नटराज दुर्गा मंडळ क्रांती चौक,न्यू छत्रपती शिवाजी चौक मंडळ सिडको, नवयुवक दुर्गा मंडळ नरहारी नगर,वैभव दुर्गा,शिवनेरी दुर्गा मंडळ हडको,अयोध्या दुर्गा मंडळ रविवार बाजार,हडको यांच्या सह वसरणी,जुना कौठा,नवीन कौठा, असदवन, असरजन,वाघाळा तर दसरा ब्रम्होत्सव निमित्ताने सिडको हडको बालाजी मंदिरात १५ ते २४ आक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे, तर ग्रामीण भागातील बळीरामपुर, विष्णुपूरी, वाजेगाव, तुप्पा,यासह अनेक गावात सार्वजनिक दुर्गा मंडळ स्थापना करण्यात आल्या आहेत.
दुर्गा महोत्सव निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, श्रीधर जगताप ,ऊपनिरीक्षक आंनद बिचेवार, महेश कोरे, महेश गायकवाड,माणिकराव हंबरडे,जाधव,जामोदकर ,पोलीस अमलंदार,महिला पोलीस,होमगार्ड , महिला होमगार्ड,यांच्या कडेकोट बंदोबस्त बालाजी मंदीर सिडको हडको सह शहरी ग्रामीण भागात ठेवण्यात आला आहे.