गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक जिवंत काडतुसासह एक इसम ताब्यात; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड| स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिनांक 08/02/2024 पोउपनि आनंद बिचेवार यांचे टिमला नांदेड शहरात पाहीजे व फरारी आरोपी शोध करुन त्यांना अटक करण्याचे आदेश देवुन रवाना केले होते. दरम्यान त्यांच्या टीमने गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र ) व एक जिवंत काडतुसासह एक इसम ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

आनंद बिचेवार पोउपनि स्थागुशा यांचे टिम पाहीजे व फरारी आरोपीस शोध व आरोपीस चेक करीत असतांना पोउपनि श्री आनंद बिचेवार यांना माहीती मिळाले की रेकॉडवरील आरोपी नामे मोहीत ऊर्फ चिकु पि. रमेश गोडबोले रा. देगावचाळ नांदेड याचेकडे एक पिस्टल व काडतुस आहेत तो गोदावरी नदी परीरातील डंकीन भागात आहे असी खात्रीशीर माहीती मिळाले वरुन त्यांनी त्यांचे सोबतचे अमलदार व पंचासह गोदावरी नदी परीसर डंकीन कडे सदर आरोपीचा शोध करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव त्याने त्याचे नाव मोहीत ऊर्फ चिकु पि.रमेश गोडबोले वय 21 वर्षे व्यवसाय बेकार रा. देगावचाळ नांदेड असे सांगीतले त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता याचे कमरेला एक अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व एक जिवंत काडतुस किमती 26,000/- रुपयाचे अग्निशस्त्र मिळुन आले सदर आरोपी विरुध्द पोउपनि श्री आनंद बिच्चेवार यांनी पो.स्टे. वजिराबाद येथे फिर्याद दिली आहे. सदर आरोपी विरुध्द पो.स्टे. वजिराबाद व विमानतळ येथे गुन्हे दाखल असुन तो पो.स्टे. वजिराबाद येथील दोन गुन्हयात फरार होता.

सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि / आनंद बिचेवार, पोलीस अमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड, तानाजी येळगे, मोतीराम पवार, गजानन बयनवाड यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!