
नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सात केंद्रावर लातूर बोर्डाच्या उच्च माध्यमिक १२ वी परिक्षांना २१ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली सुमारे २३७२ परीक्षार्थी पहिल्या दिवशी परिक्षा देत असुन कडेकोट पोलीस बंदोबस्त या परिक्षा सुरळीत झाल्या असून केंद्रावर मुख्य प्रवेशद्वारावर परिक्षा ओळख पत्र तपासणी करून प्रवेश दिला जात असुन काॅपी मुक्त वातावरण मध्ये या परीक्षांना सुरूवात झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कांकाडी येथील परिक्षा केद्रांवर भेट देऊन पाहणी केली.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शिवाजी विद्यालय सिडको येथे केंद्र प्रमुख एस.एम.देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिक्षा सुरळीत सुरू झाल्या असून या केंद्रावर एकुण विद्यार्थी २९९ परिक्षा देत आहेत तर, इंदिरा गांधी कॉलेज सिडको येथे४८६,परीक्षार्थी परिक्षा देत असुन केंद्र प्रमुख नितिन दारमोड़ हे काम पाहात आहेत, कुसुमताई विद्यालय सिडको येथे केंद्र प्रमुख एस.डी.कराड.यांच्या मार्गदर्शनाखाली २७६ विद्यार्थी परिक्षा देत आहे.
शिवशक्ति माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय काकंडी येथे केंद्र प्रमुख पवार,वी.जी हे काम पाहत असून ३३७ विद्यार्थी परिक्षा देत आहेत, वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी केंद्र प्रमुख दिंडे एन,पी.काम पाहात आहे २९७ विद्यार्थी परिक्षा देत आहेत.महात्मा फुले उच्य माध्यमिक आश्रम शाळा वाघाळा येथे केंद्र प्रमुख भास्कर पोहरे हे काम पाहात आहे,४४४ परिक्षा देत आहे. राष्ट्रमाता उच्च माध्यमिक विघालय वाजेगाव येथे केंद्र प्रमुख गाडेकर हे काम पाहत आहेत,या केद्रांवर २३३ विद्यार्थी परिक्षा देत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कांकाडी येथील शिवशक्ती माध्यमिक विद्यालय येथील केद्रांवर भेट देऊन पाहणी केली तर पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सात परिक्षा केद्रांवर भेट दिली असुन पाहणी केली, असुन परिक्षा केद्रांवर सात पोलिस अमलदार ,महिला दोन,होमगार्ड २८ असा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
