नांदेड| जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, आसना, मन्याड, लेंडी सारख्या नद्यांच्या काठावर विविध पक्षांचा अधिवास आपण पाहतो. जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि पानथळ भागात प्रामुख्याने तांबट, वेडा राघू, भारतीय नीलपंख, चित्रबलाक, काचाक्ष, पिंगलाक्ष, सुगरन, विनकर, जांभळा सूर्यपक्षी, लाल मनोली पोपट, ठिपक्यांची मनोली, कवडा खंड्या हे पक्षी आढळतात.
या पक्षांमधून नांदेडचा मानबिंदू असलेल्या पक्षाची सर्वांनुमते निवड व्हावी व जिल्ह्याला नवीन ओळख मिळावी यादृष्टिने पक्षीमित्रांनी असा निवडीबाबत आग्रह धरला आहे. ही निवड सर्वांनुमते व्हावी यादृष्टिने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://nanded.gov.in/bird-of-nanded- या संकेतस्थळावर प्रातिनिधिक पक्षी निवडीसाठी ऑनलाईन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व नांदेड जिल्हाप्रेमींनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.