श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यातील प्रशासनामध्ये प्रभारी कर्मचारी व अधिकारी असल्याने लोकसेवेत अनियमितता होत असून, एकात्मिक बाल विकास, कृषी विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय, महाराष्ट्र विद्युत महामंडळ, वनविभाग,पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय व नगर पंचायत अश्या सर्व कार्यालयामध्ये गेल्या कित्येक वर्षा पासून प्रभारी नियुक्तीवर प्रशासनाचे काम चालू आहे. त्यामुळे जनतेला त्यांची सेवा हमी बाबतची कामे विहित मुद्दतीत होत नाहीत सेवा हमी कायद्याचा विपर्यास होत आहे.
या बाबत वरिष्ठ स्थरावर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन सोशल मीडिया च्या माध्यमातून या विषयी जनतेची मागणी प्रसिद्ध करण्यात आली परंतु कायमस्वरूपी नियुक्तीचा प्रश्न अध्यापही खंडित पडलेला आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा व प्रशासनातील कामाचा वाढता तणाव लक्षात घेऊन जनतेला सुरळीत प्रशासनातील सुविधा देण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी अधिकाऱ्याची प्रती नियुक्ती करणे आवश्यक आहे.
आपल्या स्थरावरून जिल्हा नियोजन समितीच्या आढावा व कृती बैठक घेऊन वरिष्ठ स्थरावर पाठ पुरावा करून जनतेला सहकार्य करावे आणि माहूर सारख्या अतिदुर्गम भागात प्रत्येक सरकारी कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावे. करिता योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय निवेदन देण्यात आले. त्यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गोपाल खापर्डे, तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे, शहर अध्यक्ष अनिल माडपिल्लेवार, युवा आघाडी तालुका अध्यक्ष आदेश बेहेरे,सदस्य दादाराव गायकवाड, इसा सय्यद, मनोज जाधव व सोनू राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.