बिलोलीत तीन शाळकरी मुलांचा तलावात बुडून तर नांदेड मधील एका तरुणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे बामणी गावाजवळील एका पाझर तलावात तीन शाळकरी मुलांचा तर नांदेड मधील गोदावरी नदीपात्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
बिलोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे बामणी येथे पाझर तलावात गुरूवारी (दि.28) सकाळी अंदाजे साडे आठ वाजता ते नऊ वाजेच्या सुमारास, देवानंद गायकवाड, बालाजी गायकवाड, वैभव दुधारे व अन्य एक जण अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यापैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. देवानंद पिराजी गायकवाड वय 15 वर्ष , बालाजी पिराजी गायकवाड वय 12 वर्ष व वैभव पंढरी दुधारे वय 15, सर्व रा. बामणी येथील आहेत.
देवानंद व बालाजी हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर वैभव हा आई वडिलांना एकच आहे. त्यामुळे या कुटुंबावर फार मोठे संकट आले आहे. पिराजी गायकवाड हे मोल मजुरी करून मुलांना शाळा शिकवत होते. त्यांच्यावर आलेले दुर्दैवी संकट कोसळले आहे व पंढरी दुधारे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्यावर पण दुःखाचा डोंगर कोसळा ही बातमी गावात पसरतात गावातील काही लोक पाझर तलावाकडे धाव घेतली व मृतदेह शोधाशोध करून त्यांना बाहेर काढले.
नांदेड शहरात गोवर्धन घाटावर सायंकाळी विसर्जन करण्यासाठी एक तरूण गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बिलोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेशराव सोंडारे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बीट जमादार प्रभाकर गुडमलवार यांनी घटना स्थळावर जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले.