नांदेड। पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण जि. नांदेड हद्दित मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन मोबाईल चोरीचे प्रमाण कमी करुन मोबाईल चोराना अटक करुन गुन्हयातील गेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी सदर मोबाईल चोरीना आळा घालुन आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील प्रभारी अधिकारी एन.एस.आयलाने, पोलीस निरीक्षक, श्रीधर जगताप, सहा. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील महेश कोरे, पोलीस उप निरीक्षक, विक्रम वाकडे, प्रभाकर मलदोडे, ज्ञानोबा कवठेकर, शेख सत्तार मगदुम, अर्जुन मुंडे, संतोष बेल्लुरोड, शिवानंद तेजबंद, श्रीराम दासरे, शिवानंद कानगुले, सायबर सेल नांदेड यांना योग्य त्या सुचना देवुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे दाखल असलेला गु.र.नं. 855/2023 कलम 379 भा.दं.वी. तसचे गु.र.नं. 54/2024 कलम 392,34 भा.दं.वी. मधील चोरीस गेलेला मोबाईल व अज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले असता गुन्हे शोध पथकातील प्रमुख व अंमलदार यांनी आपले कौशल्य वापरुन गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीसानी सापळा रचुन आरोपी नामे शेख समीर शेख चाँद वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. घर नं.535 वाजेगाव ता.जि. नांदेड यास ताब्यात घेवुन नमुद दाखल गुन्हयासंबंधाने व इतर मोबाईल चोरीतील गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवुन विचारपुस केली असताना सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल करुन पाच मोबाईल काढुन दिले. ते मोबाईल नांदेड ग्रामीण पोलीसानी जप्त केले आहेत. त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
सदर गुन्हयाचा मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनात अधिक तपास सपोउपनि शेषराव शिंदे पो.स्टे. नांदेड ग्रा. हे करीत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गु.र.नं. 54/2024 कलम 392,34 भा.दं.वी. गुन्हयात आरोपी 1) सुमीत संतोष सरोदे वय 19 वर्ष रा. सिडको, नांदेड, 2) अजय उर्फ लड्या भगवान जोगदंड वय 22 वर्ष रा. सिडको, नांदेड, 3) साईनाथ लक्ष्मण सरसमकर वय 32 वर्ष रा. सिडको, नांदेड यांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन गुन्हयात गेलेला मुद्देमाल काढुन दिला. तसेच गुन्हयात आरोपीतांनी वापरलेली मोटार सायकल व एक खंजर जप्त करण्यात आला आहे. त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
सदर गुन्हयाचा मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनात अधिक तपास महेश गायकवाड पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रा. हे करीत आहेत. सदर गुन्हयातील आरोपीकडुन जप्त करण्यात आलेले मोबाईल मुळ मालकाना परत करण्यासाठी सदर मोबाईलचे IMEI नंबर वरुन शोध घेण्याकरिता सायबर सेल नांदेड यांना पत्र पाठवण्यात आले आहे. व जिल्हातील इतर पोलीस स्टेशनला बिनतारी संदेश पास केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत व केलेल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील टिमचे श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा.अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी अभिनंदन केले आहे.