ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अनेक भागात रस्ता रोको तर सिडको हडको परिसरातील विविध भागात टायर जाळून निषेध, बंदला शंभर टक्के प्रतिसाद.

नवीन नांदेड| मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवेली सराटी येथील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या आंदोलना पांठीबा म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नांदेड हैदराबाद व नांदेड ऊस्मानगर कंधार,नांदेड लातूर महामार्ग रोडवर रास्ता रोको तर सिडको हडको परिसरसह विविध भागात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे,तर अनेक भागात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता,बंदमुळे महामार्ग वरील रस्ता रोको आंदोलन मुळे जाणारी येणारी वाहतूक मोठया प्रमाणात खोळंबली होती.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे गेल्या २५ आक्टोबर पासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अमरण ऊपोषणास सुरूवात केली असून त्यांना पांठीबा म्हणुन ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अनेक ठिकाणी रस्ता रोको व टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला,३१ आक्टोबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या वाजेगाव चौकी समोर असणाऱ्या रोडवर,तर वाजेगाव मुदखेड रोडवरील पुणेगाव पुलाजवळ, तर नांदेड हैदराबाद रोडवर तुप्पा,पाटी जवाहर नगर , भायेगाव पाटी, बाभुळगाव पाटी येथे रस्ता रोको व हडको,सिडको,परिसरातील विविध भागात व लातूर फाटा,टायर जाळून निषेध,व्यक्त करण्यात आला,असरजन मामाचौक,सिडको हडको परिसरातील विविध वअंतर्गत भागात हॉटेल ,विवीध प्रतिष्ठाने यांनी बंद ठेवली होती बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. नागपूर ते लातुर रोडवरील धनेगाव जुन्या गावाजवळील मुख्य महामार्ग रस्त्यावर रोडवर टाकण्यात आलेल्या दगड व ईतर साहित्यांमुळे वाहतूक खोळंबली होती यावेळी बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप व पोलीस कर्मचारी यांनी स्वता:ह रस्त्यावर असलेली दगडे काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
विविध ठिकाणी रस्ता रोको व बंदला सकल मराठा समाज बांधव यांनी पुकारलेल्या बंदला मोठ्या संख्येने उपस्थितीती होती, यावेळी ऊपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या सह सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, सचिन गढवे,उपनिरीक्षक आनंद बिचेवार, माणिकराव हंबर्डे,गोविंद जाधव, ऊतम बुकतरे, जामोदेकर, महेश गायकवाड,बालाजी नरवटे,महेश कोरे,व पोलीस अमलंदार, महिला पोलीस , होमगार्ड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
