शरद पवार यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये आंदोलन; निवडणूक आयोग, भाजपचा केला निषेध

सरकारी यंत्रणा भाजपचे बाहुलं -माजीमंत्री कमलकिशोर कदम

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
4 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक खा. शरदचंद्र पवार यांच्या विरोधात अतिपक्षपातीपणाचा निकाल निवडणूक आयोगाने दिला, या निकालाच्या निषेधार्थ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांच्या समर्थनासाठी नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दि. 8 फेब्रुवारी रोजी तीव्र निषेध आंदोलन करून निवडणूक आयोग व भाजपच्याविरोधात प्रचंड घोषणेबाजी दिली. यावेळी ईडी व इतर यंत्रणा भाजपचे बाहुलं बनल्यासंदर्भातील आरोप माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी करून शरद पवारांच्या पक्षाबद्दल निवडणूक आयोगाने दिलेला निकाल नैतिकतेच्याविरोधात आहे, दलबदलू लोकांना निवडणूक आयोगाने पक्ष दिला, असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खा. शरदचंद्र पवार यांच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने जो निकाल दिला या निकालाबद्दल तीव्र असंतोष जनसामान्यांमध्ये पहावयास मिळत आहे. या निषेधार्थ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्यावतीने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात जाहीर निषेध आंदोलन केले. सदर आंदोलन माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम म्हणाले की, शरद पवार यांनी जनसामान्य माणसांत जाऊन पक्ष वाढविला. आता जे दलबदलू लोक आहेत, अशांना पक्ष दिला आहे, ही बाब नैतिकदृष्ट्या कोणालाच पटणारी नाही.

लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला विरोधकाची भुमिका बजाविण्याचा अधिकार आहे. सरकारी यंत्रणा सध्या लोकशाहीसाठी मारक ठरत आहेत. भाजप ईडी व इतर यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असे मतही कदम यांनी व्यक्त केले. यावेळी लोकशाहीसाठी काळा दिवस, निवडणूक आयोगही विकलं गेलं, जनता खातेय खस्ता भाजपला दाखवू घरचा रस्ता, लोकशाहीचे मारेकरी अजूनही मोकाट आदी स्वरूपाच्या प्रचंड घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, प्रा. डी.बी. जांभरूणकर, रमेश देशमुख शिळवणीकर, शिरीष गोरठेकर, भाऊसाहेब गोरठेकर, अ‍ॅड. अंकुश देसाई देगावकर, सुभाष गायकवाड, प्रांजली रावणगावकर, कल्पनाताई डोंगळीकर, प्रा. मजरोद्दीन, रमेश गांजापूरकर, शिवाजीराव जाधव, धनंजय सुर्यवंशी, रऊफ जमिनदार, बंटी लांडगे,

तातेराव पाटील आलेगावकर, गंगाधर कवाळे पाटील, सय्यद मौला, विश्‍वनाथ बडूरे, उत्तमराव पाटील आलेगावकर, डॉ. मुजाहिद खान, बाबुराव हंबर्डे, युनूस खान, प्रकाश मुराळकर, सिंधुताई देशमुख, दत्ता पाटील तळणीकर, राहुल जाधव, दिगांबर पेठकर, गणेश तादलापूरकर, हनमंत जगदाळे, शेख जावेद, आनंद गुडमूलवार, मधुकरराव पिंपळगावकर, सादेक पटेल, शिवानंद शिप्परकर, शिवकुमार भोसीकर, सुरज कोंडले, विश्‍वांभर भोसीकर, भिमराव कदम, रंगनाथ वाघ, प्रकार मांजरमकर, बालासाहेब मादसवाड, परशुराम वरपडे, सुभाष रावणगावकर, दिगांबर गवळे, देवराव टिप्परसे, गजानन चव्हाण, सुभाष गोरठेकर, सुनील पतंगे, यलमगुंडे, माधवराव पवार, भिमराव पेठवडजकर, संध्याताई जोंधळे, शिवकन्या क्षीरसागर, राजेश माने, सईदा बेगम, प्रेमजित कोल्हापूरे, हसीना बेगम, मोहम्मदी पटेल, फैजल सिद्धीकी, शफी उर रहेमान, गजानन वाघ, गोविंद यादव, सज्जाद अहेमद, नितीन मामडी, नागमणी चलवदे, मारोती चिवळीकर, लक्ष्मण भवरे, अब्दुला, बाळू गोरे, बालाजी मोठारे, जिलानी पटेल, भगवान बंडे, प्रकाश घोगरे, विक्कीसिंग ठाकूर, राजू राठोड, शेख रसूल, रियाज अली खान, भीमराव क्षीरसागर, पंकज कांबळे, असलम चाऊस, शेख सरदार, मोहम्मद सफराज तौफीक, वसीम खान, गुलाम मुस्ताक, प्रभाकर भीमराव, अनिल सरोदे, सिद्धार्थ जोंधळे, सतिश चवरे, काजी शशीद्दीन, जिलानी पटेल, अमितसिंघ सुखमनी, मोहसीन पठाण, गोविंद सोनटक्के, युसूफ अन्सारी, सुमित साबळे, गोपाळ ठाकूर, निरंजन मुक्कामपल्ले, रोहित पवार, महेश बंडेवार, पार्थिव जवळे, विक्रम ठाकूर, योगेश शिंदे, अजिंक्य गायकवाड, साई उबाळे, मन्मथ वाळके, असलम, पाशा खान तांबोळी आदींची उपस्थिती होती.

 

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!