कोल्हापुर येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील; पोलीस अंमलदारांची उत्कृष्ठ कामगीरी

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। महाराष्ट्र राज्य व्हेटरनस् अॅक्वॅटीक असोशिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने कोल्हापुर येथे आयोजीत 24 व्या राज्यस्तरीय मार्टस जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार जयप्रकाश मोतीराम क्षीरसागर, रामेश्वर राजकुमार जाधव व पवन मारोती चौदंते यांनी एकुण 10 पदक पटकावले.

महाराष्ट्र राज्य व्हेटरनस् अॅक्वॅटीक असोशिएशन, महाराष्ट्र यांनी कोल्हापुर येथे दिनांक 01 व 02 ऑक्टोबर रोजी 24 व्या राज्यस्तरीय मार्स्टस जलतरण स्पर्धेचे आयोजन सागर पाटील जलतरण तलाव येथे केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विवीध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नांदेड जिल्हा संघात सहभागी असलेल्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार जयप्रकाश मोतीराम क्षीरसागर यांनी 50 मीटर फ्रीस्टाईल गोल्ड मेडल, 200 मीटर वैयक्तीक मीडले रीले गोल्ड मेडल, 200 मीटर सांघीक मिडले रीले मध्ये गोल्ड मेडल व 50 मीटर बटरफ्लाय सिल्वर मेडल असे एकुण तिन सुर्वण, एक रजत पदकांची कमाई केली.

तर पोलीस अंमलदार रामेश्वर राजकुमार जाधव यांनी 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात गोल्ड मेडल, 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सिल्वर मेडल व 200 मीटर सांघीक मिडले रीले प्रकारात ब्रॉन्झ मेडल पटकावत एकुण तिन मेडल्सची कमाई केली. तसेच पवन मारोती चौदंते यांनी 50 मीटर बॅकस्ट्रोक गोल्ड मेडल, 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक सिल्वर मेडल व 200 मीटर सांघीक मिडले रीले प्रकारात ब्रॉन्झ मेडल पटकावले.

या यशाबद्दल नांदेड जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार, पोलीस उप अधीक्षक (गृह) श्रीमती अश्विनी जगताप, राखीव पोलीस निरीक्षक श्री विजय धोंडगे, क्रीडा विभाग प्रमुख संतोष सोनसळे यांनी विजयी अंमलदारांचे कौतुक करून अभिनंदन केले.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!