नांदेड। नांदेड शहरात दिवसेदिवस वाढत असलेल्या मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयात प्रतिबंध व गुन्हे उघड करणे बाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड मा.श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते, त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन विमातळ नांदेड येथील प्रभारी पोलीस अधिकारी श्री विजय जाधव यांनी गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन करुन चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणण्या बाबत वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले.
पो.स्टे. विमानतळ नांदेड येथील गुन्हे शोध पथका प्रमुख पो.उप. निरी. श्री जाधव, सोबत पोहेकॉ / 2166 राठोड, पो.हे.कॉ / 2403 पठाण, पो.हे.कॉ /721 जावेद, पो.कॉ /67 भिसे, पो.कॉ/72 कुलथे, पो.कॉ / 621 डोईफोडे यां सर्वाना मोटार सायकल चोरीचे आरोपीची माहीती प्राप्त झाली की, पोलीस स्टेंशन विमानतळ नांदेड येथील गु.र.न. 375/2023 कलम 302,120 (ब) भा.द.वि. व सह कलम 04/25 भा.ह.का. मधिल आरोपी नामे विश्वास परमेश्वर शिंदे वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. शारदानगर नांदेड हयाने नांदेड शहरातील विविध ठिकाणच्या मोटार सायकल हया चोरी केलेल्या आहेत. त्यावरुन सदर गुन्हयातील आरोपी यास पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड गु.र.न. 339/2023 कलम 379 भा.द.वि. मध्ये संशयीत रित्या मा.न्यायालच्या परवानगी ताब्यात घेवुन त्यास अटक करुन त्याची पो.क.रि. दरम्यान विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयातील वाहना सोबत इतर पाच मोटार सायकल हया काढुन दिल्या आहेत. असे एकुण 4,20,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक मा.श्री अबिनाथ कुमार, अपर पोलीस अधीक्षक भोकर डॉ.श्री खंडेराव धरणे तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी मा. श्रीमती किर्तीका सी.एम. उप. विभाग नांदेड शहर नांदेड पोलीस निरीक्षक श्री नागनाथ आयलाने पोलीस निरीक्षक पो.स्टे. विमानतळ नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी पार पाडली आहे. मा. वरीष्ठ अधिकारी यांनी चांगली कामगीरी केली या साठी त्यांना सुभेच्छा दिल्या आहेत.