
नांदेड। १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात एमजीएम कॉलेज समोरील संघर्ष भवन,सीटू कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी जागतिक कीर्तीचे तत्ववेते तथा जगातील कामगारांनो एक व्हा! असा संदेश देणारे कॉ.कार्ल मार्क्स आणि भारतीय राज्य घटनतेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कामगार कष्टकऱ्यांच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.सीटूचे नांदेड जिल्हा संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभने, सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार,सीटूचे जिल्हा महासचिव कॉ.गंगाधर गायकवाड, डीवायएफआयचे कॉ. श्याम सरोदे,कॉ.जयराज गायकवाड, गगन परीवाले,अ.भा. जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड,कॉ. लता गायकवाड,भाकप (माले)चे कॉ. दिगंबर घायाळे, अनिसचे कॉ. इरवंत सूर्यकार, कॉ.बालाजी पाटोळे सर,सीटूचे प्रमुख कार्यकर्ते कॉ.मारोती केंद्रे, कॉ.सोनाजी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
