
हिमायतनगर। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ‘यशवंतराव चव्हाण’ यांची जयंती दि .१२मार्च २०२४ ,मंगळवार रोजी हु.ज.पा. महाविद्यालयात महाराष्ट्राला सर्वार्थाने समृद्ध करनाऱ्या आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती सांस्कृतिक विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते होत्या तर प्रमुख उपस्थिती इतिहास विभाग प्रमुख डॉ.वसंत कदम यांची होती. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते ‘यशवंतराव चव्हाण’ यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ.कदम म्हणाले की चव्हाण साहेब हा मराठी मनांचा मानबिंदू असून, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होत.महाराष्ट्राच्या कृषी व ओद्योगिक विकासाचा पाया घालणारा,महाराष्ट्रात सहकार चे जाळे विणणारा आणि पंचायतच्या माध्यमातून तलगलातल्या समाजाला लोकशाही लोकशाही ताकदीचे भान देणारा दूरदृष्टीचा नेता होता.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. सदावर्ते म्हणल्या की,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब आहेत.त्या काळात त्यानि अनेक महत्वाचे निर्णय घेऊन सामाजिक, आर्थिक, संस्कृतिक साऱ्याच अंगांनी नव्या राज्याची पायाभरणी केली.त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन पुढच्या पिढीने प्रगती करावी अशा त्या म्हणाल्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.सविता बोंढारे यांनी केले तर आभार डॉ.आशिष दिवडे यांनी मांडले.
