नांदेड| महात्मा फुले हायस्कूलचे सहशिक्षक तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणेच्या मराठी भाषा विषयासाठी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी नांदेड येथील स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
याप्रसंगी उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, उप शिक्षणाधिकारी (योजना) पेठवडजकर मॅडम, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गजानन पांपटवार यांची उपस्थित होती. स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक सहविचार सभेचे आयोजन केले होते. यावेळी संस्थेच्या वतीने डॉ. राम वाघमारे यांचा शाल, पुष्पहार व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थीतांना शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवदास गायकवाड यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक शिंदे यांनी मानले. या सहविचार सभेत संस्थेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.