उमरखेड| घराचे प्लॉटचे कागदपत्र गहाण ठेवून अवैध सावकारी व्यवसाय करणारा सावकार व्याजाच्या पैशासाठी तगादा लावत असल्याने तक्रारदाराने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे तक्रार दाखल केल्याने आज उपनिबंधक पथकाने अवैध सावकार याचे घरावर धाड टाकून घरातील संशयास्पद 161 कागदपत्रे जप्त करण्यात आले या कारवाईने अवैध सावकारी करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे .

नारायण बाळाभाऊ निमजवार रा . चिरडे नगर महागाव रोड उमरखेड असे अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराचे नाव असून उमरखेड मधील शिवाजी वार्ड येथील रहिवासी शाम तुकाराम गोसावी याच्या घराचे कागदपत्रे ठेवून व्याजानं पैसे दिले होते आणि दिलेल्या पैशाचा व्याजापोटी सदर सावकार तगादा लावत असल्याने श्याम गोसावी यांनी १५ जानेवारी २४ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे तक्रार दाखल केल्यावरून आज दिनांक 13 रोजी सदर अर्जाच्या अनुषंगाने पडताळणीसाठी उपनिबंधक सावकारी पथकाने नारायण निमजवार याच्या चिरडे नगर येथील घरावर धाड टाकून झडती घेतली या कारवाईदरम्यान निमजवार याचे घरातून संशयास्पद कोरे चेक , कोरे स्टॅम्प पेपर , खरेदी खत ,नोंदी असलेल्या डायऱ्या व हिशोबाच्या चिठ्ठ्या अशा एकूण 161 कागदपत्रे जप्त करण्यात आले असून सदर कागदपत्राची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार पुढील कारवाईसाठी प्रस्तावित करण्यात येणार आहे .

सदर कारवाई जिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख व्ही के हिरुडकर सहा निबंधक उमरखेड , एस एस भालेराव सहा निबंधक पुसद , ए डी भागानगरे महागाव ,ओ एम पहुरकर यवतमाळ , एस एस पिंपरखेडे , शिरीष अभ्यंकर , कु. एस एस थोरात , कु . संध्या पालकर , चेतन रतनसिंग राठोड , प्रफुल चाटे , यांनी पार पाडली . सदर कारवाई दरम्यान पंच म्हणून महसूल विभागातील गजानन राजने व संदेश पोहदरे उपस्थित होते . यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण ,जमादार संतोष चव्हाण , मोहन चाटे व श्रुती साबळे यांनी चोख बंदोबस्त लावला होता .

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version