नांदेड| सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात आज एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्या जातो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना या सर्व बाबींची माहिती होण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता व कंपनीला लागणारे कौशल्य यांच्यातील शैक्षणिक दरी मिटवण्यासाठी बीएमएस व टाटा Strive यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रोजेक्ट व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे आयएमएस सदस्य हर्षद शहा उपस्थित होते. एस.जी.जी.एस. इंजिनीअरींग कॉलेजचे एचओडी डॉ. गणेश पाकळे निरीक्षक म्हणून तर हूजूर साहिब आद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे भिमसिंग व जगजितपाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी भुषवले. बीएमएस व टाटा Strive चे व्यवस्थापक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
बीएमएस व टाटा Strive यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देवून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आयएमसीचे सदस्य हर्षद शहा यांनी आधुनिक तंत्रज्ञानामुळे दैनंदिन कामे लवकर आणि सहज होतात. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अंगीकृत करावा, असे आपल्या भाषणात नमूद केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी मुल्यवर्धीत शिक्षण घेण्याचे प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन केले. तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचे नविन मार्ग उपलब्ध होत आहेत. त्याचा जास्तीत जास्त फायदा प्रशिक्षणार्थ्यांनी जीवनात करून घ्यावा, असे सांगीतले.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यांचे कौतूक केले. प्रत्येकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना BMS व TaTa Strive यांच्या मार्फत बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन संस्थेतील गटनिदेशिका सौ. के. टी. दासवाड यांनी केले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डी. ए. पोतदार यांनी मानले. कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात पालक, प्रशिक्षणार्थी संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.