नांदेड| येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम यांच्या पत्नी सौ. पुष्पाताई कदम यांचे २२ जुलै २०२५ रोजी निधन झाले. त्या ६८ वर्षाच्या होत्या.
डॉ.जगदीश कदम यांच्या पत्नी सौ. पुष्पाताई काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांचेवर उपचार चालू असतानाच काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. नांदेड येथील गोवर्धन घाटावर त्यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर,माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, श्रीकांत देशमुख,देविदास फुलारी, दिलीप धर्माधिकारी,प्रा. उत्तमराव बोकारे, प्रा. एस डी बोखारे,
ज्येष्ठ संपादक कृष्णा भाऊ शेवडीकर, प्राचार्य नागनाथ पाटील, दैनिक गोदातीर समाचार चे संपादक केशव घोणसे पाटील,बापू दासरी, भगवान अंजनीकर, शिवा कांबळे, प्रा नारायण शिंदे, प्राचार्य आबासाहेब कल्याणकर,दिगांबरराव क्षीरसागर, पंढरीनाथ बोकारे (पत्रकार), प्रा. डॉ कमलाकर चव्हाण,प्राचार्य एटी शिंदे,प्रा. व्यंकटी पावडे,व्यंकटेश चौधरी,प्रा. डावळे सर.प्राचार्य कदम,प्रा डी बी जांभरुणकर,प्रा कोम्पलवार,दत्ता डांगे,भास्कर बुवा शिंदे, प्र श्री जाधव, पप्पुलवार सर‘,प्राध् गोविंद किन्हाळकर, आनंदराव कल्याणकर,प्रा मनोज बोरगावकर,प्रा वडजेय,प्रवीण गायकवाड, भीमराव राऊत, विजय चित्तरवार, पंडित पाटील,ढोणे पाटील विवेक मोरे,राम तरटे, डॉ गजानन देवकर,प्रा डॉ संजय जगताप, प्रा रामदास बोकारे, गंगाधर सोनकांबळे, प्रा महेंद्र देशमुख, डॉ संदीप बोखारे हे उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,सुन,दोन नातू असा परिवार आहे. कुरुंदा येथील स्वातंत्र्य सैनिक नानासाहेब दळवी यांची कन्या असलेल्या पुष्पाताई यांनी जिल्हा परिषदेच्या मुलीचे हायस्कूलनांदेड, पिंपळगाव( म),मालेगाव येथे माध्यमिक शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून उत्कृष्ट प्रदीर्घ सेवा केली.स्वभाने अत्यंत शात,संयमी, कर्तव्यदक्ष, कुटुंब वत्सल व माणूसकी जपणाऱ्या होत्या. नवऱ्याच्या साहित्य लेखनाला बळ देणाऱ्या होत्या अश्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.