नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्टावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले विद्यार्थी दशेपासून पक्षाच्या माध्यमातून काम करून महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेले आणि जनसामान्यांच्या प्रश्नासाठी व पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रीय सहभागी असणारे मकसूद पटेल लोहगावकर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या नांदेड दक्षिण दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचारांची ज्योत पुढे नेण्यासाठी व पक्ष कार्य जोमाने चालवण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागळातील सर्व जनतेपर्यंत पोहचावे यासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल भाई पटेल, प्रदेश अध्यक्ष मा.सुनील तटकरे, आरोग्य मंत्री ना.हसन मुश्रीफ, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली मकसूद पटेल लोहगावकर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा.इद्रीस इलियास नायकवडी व प्रदेश कार्यध्यक्ष मा.वासिम बुऱ्हाण तसेच नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.दिलीपरावजी धर्माधिकारी यांच्या नेतृत्वात नांदेड शहरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरा घरात पोहचावण्यासाठी प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया मकसूद पटेल लोहगावकर यांनी व्यक्त केली आहे.

आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अल्पसंख्यांक समाजाचा चेहरा व ओळख असलेले मकसूद पटेल लोहगावकर यांची नांदेड अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या या निवडी बद्दल नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.दिलीपरावजी धर्माधिकारी, सरचिटणीस शिवाजीराव धर्माधिकारी , शहर अध्यक्ष जीवन घोगरे पाटील, कार्याध्यक्ष फेरोज पटेल, उमरीचे तालुका अध्यक्ष विक्रम देशमुख, कंधारचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, माधव कदम सिरसीकर आदींनी शुभेच्छा दिल्या.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version