नांदेड| कधीही जाती-पातीचे राजकारण न करणाऱ्या, अनेक बहुजन चळवळीतून खासदार झालेल्या खासदार हेमंत पाटील यांच्यावर खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून घेतला कसा, असा संतप्त सवाल हजारोंच्या संख्येने असणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी नांदेडमध्ये उपस्थित केला.

नांदेडमध्ये हेमंत पाटील यांच्यावर शासकीय रुग्णालयाचे डीन डॉ.एस. आर. वाकोडे यांनी स्थानिक नेत्याच्या दबावातून ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. द्वेषातून ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला, हे पुढे आले. खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला, याचे पडसाद अवघ्या राज्यात उमटले. ठिकठिकणी खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तीव्र निषेध करीत धरणे आंदोलन, निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

आज नांदेडमध्ये आदिवासी समाज सेवा मंडळ, बिरसा मुंडा सामाजिक संघटना, अण्णा भाऊ साठे क्रांती फोर्स, लहूजी शक्ती सेना, राष्ट्रीय बहुजन आघाडी, बिरसा मुंडा युवक दल, मराठवाडा आदिवासी संघ, सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, आ.भा. छावा, छावा क्रांतिवीर सेना, मराठा क्रांती मोर्चा,ठोक मराठा मोर्चा यासह ५७ समविचारी संस्था, संघटनांनी खासदार हेमंत पाटील यांच्या समर्थनाथ मोर्चा काढला.

राज्यभरातून या मोर्चाला समर्थन देण्यासाठी अनेक आदिवासी बांधवही हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व करणारे अनेकजण त्या त्या संघटनेचे राज्यात नेतृत्व करणारे होते. खासदार हेमंत पाटील यांच्या समर्थनात नांदेडप्रमाणे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मोर्चे निघणार आहेत, अशी माहिती यावेळी संयोजकांनी दिली. नांदेडच्या तिरंगा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या गेटजवळ जाऊन थांबला.

त्यानंतर प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सौ.संतोषी देवकुळे यांना लेखी निवेदन देऊन संतप्त मोर्चेकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावरील ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या, असे खोटे गुन्हे परत दाखल होणार नाहीत, याची भविष्यात खबरदारी घ्या. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या नातेवाईकांना न्याय द्या, अशी मागणी केली. या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचा समारोप करताना माध्यमांसमोर तीव्र शब्दांत आप-आपल्या भावना व्यक्त केल्या.

समाजा-समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने काही राजकीय मंडळी हेतुपुरस्सर खोट्या ॲट्रॉसिटीसारखे प्रयोग करीत आहेत, याला वेळीच आळा घातला नाही तर प्रशासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत मोर्चेकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व समविचारी संघटना आणि सर्व जातीधर्माच्या संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यक्ती आजच्या मोर्चात सहभागी झाले होते, विशेष म्हणजे मृतांचे नातेवाईक ज्यांनी रुग्णालयातील अस्वच्छता आपबिती अनुभवली हे या मोर्चात सामील होते.

लोकप्रतिनिधी म्हणून खा.हेमंत पाटील यांनी प्रश्न विचारले तर अॅट्रासिटी मग सर्व सामान्यांचे काय? असा संतप्त सवाल मोर्चेकऱ्यांनी विचारला

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version