हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहराच्या परिसरात नादेड उमरखेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भानेगाव रोडवर मंगळवारी राञी 10 वाजेच्या सुमारास एका भरधाव वेगाने वाहन चालवणा-या आटोचालकाने चार जणांना उडविले आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असुन, दोघांची प्रकृति चिंताजानक आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्यापासून अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यावर संबंधित प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे दिवसें दिवस अपघात वाढत आहेत. नादेड उमरखेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भानेगाव रोडवर मंगळवारी राञी 10 वाजेच्या सुमारास एका भरधाव वेगातील ऑटोचालकाने ४ जाणं उडविले आहे. या घटनेत दोन जण ठार झाले असुन, पंकज पांडुरंग भालेराव रा भानेगाव ता हदगाव, सुरेश लक्ष्मण घायडे रा जुने बस्थानक असे मृत्यू व्यक्तीची नवे आहेत.

तर या अपघातात जख्मी झालेल्यामध्ये मारोती भालेराव, जयराम काळे हे गंभीर जख्मी आहेत. विशेष म्हणजे वृत्त लिहीपर्यंत भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या आटोचालकाच पोलिस डायरीत नाव सुद्धा नमूद करण्यात आलेले नाही. ही आपघाताची घटना ताजी आसतांनाच आज दि 11 आक्टोबर रोजी दु.2-30 दरम्यान हदगाव शहरातील तामसा रोड वरील डोगरगाव कार्नरवर एका भरधाव मोटार सायकल धारकाने कारला धडक दिली आहे. या मध्ये टूव्हिलर चालकासह कारचालक गंभीर जख्मी आहेत.

हे सर्व आपघात प्रशासनाचे वाहन चालकावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने होत आहेत. बहुतांश अल्पवयीन बालक देखील वाहन चालवित असताना दिसले तरी पोलिस प्रशासनाचे काम निव्वळ नोद घेण्याचे केद्र झाले आसुन, या भरधाव चालवणा-या वाहन चालकावर ठोस अशी कारवाई होत नसल्याने अश्या घटना घडत आहे हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version