श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| जिल्ह्यात दिनांक 14 ऑगस्ट रोजी च्या मध्यरात्रीपासून तर आज पर्यंत पावसाचा जोर जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये कायम असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदयांना ओला दुष्काळ जाहीर करा. आणि सरसकट हेक्टरी 50.000 (पन्नास हजार) रुपये शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यास संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये तात्काळ जमा करण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांचे सह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.

अतिवृष्टीची नोंद झाल्याचे जिल्हाधिकारी महोदय यांनी जिल्हा माहिती व प्रसारण च्या माध्यमातून चित्रफिताद्वारे अतिवृष्टीचे नोंदविण्यात आलेले सार्वजनिक केले असून, शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरामध्ये वाहून गेल्याने पुरुष बालकांसह महिलां मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. प्रति मृत व्यक्ती 10.00000(दहा लाख रुपये ) कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावी तसेच नागरी वस्ती मध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे राहत्या घरातील अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या नुकसान घरांची पडझड गाई गोठे, पशुधना ची जीवित हानी झाली आहे.

जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुक्यामधील महसुली मंडळ निहाय तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकास यांचे संयुक्त पंचनामे तात्काळ करण्याकरिता आदेशित करावे. पीक नुकसानी सह इतर सर्व नुकसान भरपाई देण्यात याव्यात विना विलंब सरसकट शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करून शेतकऱ्यांना वर्षा काठीचे आपल्या शेतातून मिळणारी आर्थिक मिळकत शेतातील पिके वाहून गेल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे वर्षाकाठीचे वैद्यकीय तसेच मुला व मुलींचे शैक्षणिक खर्च भागवायचं तरी कुठून या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही.

सरकारने सर्व नुकसानीचे भरीव आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना मानसिक आधार घेऊन जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नाही नुकसानीचा मोबदला लाभार्थ्यांना तात्काळ जमा करण्यात यावा. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड यांच्यावतीने मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड, मानवीसे राज्य उपाध्यक्ष दीपक स्वामी, मनविसे जिल्हाध्यक्ष पवन पाटील, मानवीसे शहराध्यक्ष शुभम पाटील, मानवीसे जिल्हाध्यक्ष शक्ती परमार, मानवाचे जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मोरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष विशाल पावडे, भोकर माजी शहर अध्यक्ष आकाश घंटेवाड, मानवीसे शहर सचिव अमर कोंडराज, मनसैनिक धम्मपाल आढाव, विठ्ठल राठोड, संजय खराडे, जिल्हाधिकारी सह मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version