श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यात दि. १५ व १६ ऑगस्ट २०२५ रोजी अतिवृष्टी झाली त्यातल्या त्यात इसापूर धरणाचे १३ गेट उघडून पैनगंगा नदीत पाणी सोडन्यात आल्यामुळे पैनगंगा नदीला महापूर येऊन शेताकाठच्या नाल्या ओढ्यांना प्रचंड मोठा महापूर आल्याने तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात महापुराचे पाणी गेल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अनेक शेतकऱ्यांचे शेत खरडून गेले. तसेच गोठ्यावर बांधून असलेले पशुधन सुद्धा मृत्यू मुखी पडले. शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी औजारे व साहित्यांचे नुकसान झाले. तसेच गावातील काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी माहूर तालुका ए आय एम आय एम च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

दि. १५ व १६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांचे व शेतजमिन, पशुधन शेतीउपयोगी औजारे व इतर साहित्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर – करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकरी व नागरिकांना शासनाकडून सरसकट हेक्टरी १ लाख रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे. अन्यथा वेळप्रसंगी माहूर तालुका आय एम आय एम शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी रस्त्यावर उतरेल असा इशाराही देण्यात आलेला आहे.

यावेळी ए आय एम आय एम चे माहूर तालुका अध्यक्ष शेख सज्जाद शेख अजिज युवक तालुका अध्यक्ष फैजुल्ला खान शहजाद नवाब शेख अरसलान कलीम खान रिजवान फारुकी शेख अजीज शोएब शेख शहीद लाला शेख अयूब शेख कयूम अरशद खान सोहेल शेख अभिजीत कांबले यांचे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version