हिमायतनगर| सवना ज, जिरोणा,रमणवाडी, गणेशवाडी, महादापुर,दगडवाडी, चिचोर्डी, एकघरी, वाशी, पार्डी ज, पिछोडी भागातील पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ मंदिराच्या यात्रे बाबत दि.११ डिसेबर रोजी भाविकांची बैठक संपन्न झाली. परपरे नुसार जानेवारी महिन्यांतील पहिल्या सोमवारी १ जानेवारी २०२४ पासुन यात्रा भरविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

हिमायतनगर तालुक्यातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पार्श्वनाथ महादेव यात्रेच्या अनुषंगाने नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा सह विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड म्हणाले. यात्रेतील स्पर्धेसाठी ज्यां भाविकांना बक्षिसे स्वयंस्फुर्तीने द्यायची असतील त्यांनी संपर्क साधावा असे आवाहनही गोपतवाड यांनी केले आहे.

याप्रसगी कामनराव वानखेडे, गणेशराव भुसाळे,दिलीप आडे, सोनबा राऊत, सरपंच बळवंत जाधव, गंगाराम ढोले, सुनील शिरडे, संदिप झळके, ऊपसरपच वसंत जाधव, गणपतराव गोपेवाड पाटील, गंगाधर पाटील मिराशे,वामनराव जाधव, आनंदराव बोलसटवार,मारोती राऊत, परमेश्वर संगनवाड, प्रभाकर राऊत,लखन जाधव, आडेलु गुंडेकर,प्रकाश अनगुलवार, पांडुरंग गुंडेकर, प्रभाकर राऊत, साहेबराव भालेराव यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version