the doctors of Deglur Upazila Hospital were honored by the Journalist Protection Committee देगलूर, गंगाधर मठवाले| डॉक्टर डे निमित्त उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा पत्रकार संरक्षण समिती, देगलूर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर, डॉ. मलशेटवार, डॉ. उस्मान सर, डॉ. काझी, डॉ. नुकुलवाड, डॉ. सचिन गायकवाड तसेच इतर डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मान समारंभात डॉक्टरांना शाल व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष शेख असलम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “डॉक्टर हा समाजातील खरा आधारस्तंभ आहे.
विशेषतः कोरोना काळात डॉक्टर्सनी जीव धोक्यात घालून समाजाची सेवा केली आहे. अशा सेवाभावी व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांनी पत्रकार संरक्षण समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करत, संपूर्ण टीमचे आभार मानले आणि भविष्यातही असे उपक्रम राबवत राहावेत, अशी शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम, सचिव गजानन टेकाळे, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, सहकार्यध्यक्ष धनाजी जोशी, संघटक श्वेता चिदमलवाड, सहसंघटक प्रभु वंकलवार, सदस्य इस्माईल खान, शेख अफन आदी उपस्थित होते.