नवीन नांदेड। अवतार सिंग मित्र मंडळ सिडको यांच्या वतीने खुबा मस्जिद क्रांती चौक येथे नमाज आदा झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांना गुलाब पुष्प देऊन सामाजिक कार्यकर्ते अवतार सिंग सोडी यांनी शुभेच्छा दिल्या, यावेळी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रमजान ईद निमित्ताने सिडको परिसरातील खुबा, नुर, फिरदोस परिसरात मनपा सिडको झोनचे सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे स्वच्छता निरीक्षक अरजृन बागडी, किशन वाघमारे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्या साहाय्याने साफ सफाई केली तर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रमजान ईद निमित्ताने खुबा मस्जिद येथे मौलाना फारूक यांनी नमाज अदा करून सुख शांती लाभो हि प्रार्थना केली, प्रार्थना नंतर मुस्लिम समाज बांधवांना अवतार सिंग सोडी,डॉ.नरेश रायेवार,नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, छायाचित्रकार सारंग नेरलकर, राजु टमाना,सचिन बारटक्के,अंमलदार माने एम.जी.यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मस्जिद अध्यक्ष मसुदोध्दीन अन्सारी, हाफिज मुख्तार,शेख अशफाक मोईदिन,सय्यद साहब, हबु खान,तोफीक खान,महंमद शकील, आखेब अहेमद खान,आहात खाॅन पठाण,शेखलतिफ,शेख असलम, शेख मुक्रम,महंमद रिजवान, शेख मोईन लाठकर, शेख मुनाफ,यांच्या सह प्रतिष्ठीत सामाजिक समाज बांधव व युवक, लहान मुले उपस्थितीत होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version