नांदेड/हिंगोली। औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार सर्कल मधील ११ गावची मागील १ महिन्यापासून वीज पुरवठा खंडित होता. या गावातील विजेचा धक्का शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना देखील बसला, खासदार हेमंत पाटील यांनी विजेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नविन विज रोहित्र बसवुन दिल्याने शेतक-यांना शेतीसाठी लागणारी वीज उपलब्ध झाली, गावठाणचा विज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला. यामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत.

खरीपा नंतर शेतक-यांनी रब्बीच्या पेरणीला सुरवात केली असून गहू, हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे परंत शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार सर्कल मधील नागेशवाडी, पुरजळ, रांजाळा वड़द, आजरसोंडा, नालेगाव, टाकळगव्हाण, पोटा खुर्द, आसोला तर्फ औंढा कोंडशी शिरला या गावांचा विद्युत पुरवठा ३३ के.व्ही. उपकेंद्रातील ५ किलो मेगा वॅटच्या शेती पंपाचा ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे मागील एक महिन्यापासून विज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.

याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्या कळमनुरी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडे तक्रार दाखल होताच तात्काळ त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली. खासदार हेमंत पाटील यांनी स्वतः हिंगोली जिल्हा महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून व पत्र देऊन संबंधित गावातील शेतीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या यावर महावितरण विभागाने तातडीने कारवाई करून अवघ्या दोन दिवसात ५ किलो मेगा वॅटचा टान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला आणि विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला.

ऐरवी सरकारी काम आणि महिनाभर यांच अशी परिस्थिती असताना सर्व सामान्य माणसाला याचा सामना करावा लागतो परंत लोकप्रतिनिधीनी दखल घेताच सर्व यंत्रणा गतिमान झाल्याचा प्रत्यय आला यामुळे जवळा बाजार सर्कल मधील संबंधित गावातील शेतीचा विज प्रश्न मार्गी लागून शेतीसाठी विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कार्याचे आणि त्यांच्या यंत्रणेचे कौतक करून आभार मानले आहेत. शेतकर्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असलेले खासदार हेमंत पाटील यांनी प्रामुख्याने प्राधान्य देऊन प्रश्न सोडविले आहेत.

शेतक-यांच्या प्रश्नांची आणि अडीअडचणीच्या काळात तात्काळ दखल घेऊन समस्या सोडविल्याचा प्रसंग आम्ही आजवर पाहिला नाही परंतु खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेऊन आम्हाला न्याय दिला आहे ख-या अर्थाने खासदार हेमंत पाटील हेच हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांचे कैवारी आहेत. शेतकरी ज्ञानेश्वर ढोबळे

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version