नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी श्रीमती कमलताई लांडगे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या संकल्पनेतून नव्यानेच पक्षात रोजगार व स्वयंरोजगार विभागाची निर्मिती करण्यात आलेली असून या विभागाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.पुजाताई जेथे व पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या शुभहस्ते नांदेड येथिल एका कार्यक्रमात आज सदरचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे, शहर जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापुरकर, युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी,महिला जिल्हाध्यक्षा सौ.सिंधूताई देशमुख,राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे,फैजल सिद्दीकी,महुमदी पटेल,अमित कांबळे,शफी उर रहेमान, युनूसखान, परमजीत कौर,साजीदा बेगम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती कमलताई लांडगे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार व खा.सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थापनेपासून ते आजतागायत राष्ट्रवादीत कार्यरत असून पक्ष संघटन वाढीसह महिला बचत गटांच्या माध्यमातून त्या सदैव कर्तव्यतत्पर असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांची राष्ट्रवादीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी आज नियुक्ती करुन या विभागाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.पुजाताई जेथे यांनी आपल्या नांदेड दौर्‍यात आज नियुक्तीपत्र दिले या नवनियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून आगामी काळात पदाच्या माध्यमातून तळागाळातील सर्वच समाजघटकांतील शेकडो जनता,युवक-युवती व महिलांना रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसाठी सोबतच,आपण पक्ष वाढीसाठीही निश्चितच प्रयत्न करु अशी ग्वाही नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्षा श्रीमती कमलताई लांडगे यांनी दिली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version