नांदेड| गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . या पार्श्वभूमीवर भोकर तालुक्यातील भोसी परिसरातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीतील पिकांची खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली .शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. राज्य आणि केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे .त्यामुळे निश्चितपणे नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असा विश्वास खा. चिखलीकर यांनी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला .

गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. भोकर तालुक्यातही अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे . रब्बी हंगामासह खरीप हंगामातील तूर, कापूस या नगदी पिकांचे नुकसान झाले. शिवाय केळी आणि बागायती शेतीला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे आज भोकर तालुक्यातील भिसी येथे भेट दिली . यावेळी त्यांनी परिसरातील शेतीच्या नुकसानीचे पाहणे केली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण अनुदान मिळवून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत .

निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या या वेदना समजून घेऊन त्यांना अर्थसहाय्य करतील असा विश्वासही खा. चिखलीकर यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला . या दौऱ्यात नायब तहसीलदार रेखा चामनवार , गटविकास अधिकारी केंद्रे, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, मंडळ अधिकारी मगरे, कृषी मंडळ अधिकारी मिसाळ यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजा खंडेराव देशमुख , किशोर पाटील, दिलीप सोनटक्के ,तालुका अध्यक्ष गणेश कापसे , युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील बोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लघळुदकर आदींची उपस्थिती होती.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version