नांदेड| बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज अशोक विजया दशमीदिनी सकाळी 7 वाजता हजारो उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये महाबुद्ध वंदनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.

अडीच हजार वर्षांचा दैदिप्यमान असा ऐतिहासिक वारसा लाभलेले नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तथा धार्मिक चळवळीचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. एक धम्म अनुयायी बौद्ध म्हणून आपल्या समृद्ध आध्यात्मिक परंपरांचा उत्साह तेवत ठेवणेसाठी, भगवान बुद्धाच्या शिकवणींचा आदर करण्यासाठी आणि सुसंवाद, करुणा आणि सजगता वाढविण्यासाठी नांदेड शहरातील आंबेडकरवादी युवकांनी पुढाकार घेत महाबुद्ध वंदनेचे आयोजन दि. २४ ऑक्टोबर २०२३ अर्थात अशोक विजयादशमी दिनी सकाळी ठीक ७ वाजता पू. भिकखु संघाच्या उपस्थितीत आयोजन केले. पू. भदंत दयानंदजी महास्थवीर, पू. भिक्खू पय्यारत्न, पू. भिक्खू पय्याबोधि, भिकखु बुद्धभूषण, भिख्खुनी चारुशीला व पू. भिकखु संघाच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हजारो अबाल वृद्ध, श्रद्धावान उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये महाबुद्ध वंदने चा कार्यक्रम संपन्न झाला.

भारतीय बौध्द महासभा जि. अध्यक्ष पि एम वाघमारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नांदेड शहरातील आंबेडकरवादी युवकांनी सहभाग नोंदवत या महाबुद्ध वंदनीचे उत्कृष्ट उत्कृष्ट नियोजन केले. याप्रसंगी जिल्हा प्रशासन तथा पोलीस अधिकारी महानगर पालिका प्रशासन यांचे यथोचित सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना अतिष ढगे यांनी तर आभार आयु. प्रशिक गायकवाड यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपा डि पी गायकवाड यांनी केले.

अशोक विजय दशमी दिनी नांदेड शहरामध्ये आयोजित केलेल्या या पहिल्याच महाबुद्ध वंदना कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक गायकवाड, रोहन कहाळेकर, आतिष ढगे, अभय सोनकांबळे, आंकुश सुर्यवंशी, आशिक थोरात, अनिकेत सोनवने, दिनेश येरेकर, कांचन जोंधळे, प्रिया भालेराव, लखन कारले, ऋषभ महादळे, कपिल ढवळे, संदिप वाठोरे, संदिप गोनारकर, ज्ञानदीप कांबळे, भास्कर गजभारे, साई पाटिल, योगेश सोनाळे, किरण सदावर्ते, अमोल गोनारकर, नितेश हानंमते, कपिल वाहुळे, गब्बर सोनवने आदींनी परिश्रम घेतले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version