सुरूवातीला जेव्हा “पाणी” विकायला सुरूवात झाली,तेव्हाच आपण जागे व्हायला हवे होते! “पाणी म्हणजेच जीवन!” हे आपण जाणून घेणे अवश्यक होते.पाण्यासच “जल”असे संबोधिले जाते!अर्थात “ज”,जन्मा पासून ते “ल”,लयाला जाईपर्यंत (मृत्यू येई पर्यंत) पाणी अवश्यक अशी बाब आहे.! पण आपण त्यास सहज घेतले! हालक्यानं घेतले!मनमुराद पाण्याचा व्यर्थ व्यय केला!आपणास पाण्याची किंमतच कळली नाही! म्हणून आज पाण्याच्या गंभीर प्रश्नास आपणास सामोरे जावे लागत आहे.पाण्याच्या भिषण दुर्भिक्षतेचा आपणास सामना करावा लागत आहे!
तद्वतच,तसेच तथा किंबहूना त्या पेक्षाही विदारक तथा भयाणक अशा “शुद्ध हवेच्या” दुर्भिक्षतेच्या स्थितीचा भविषात (दहा ते पंधरा वर्षातच) आपणास सामना करावा लागणार आहे ! हे आत्ताच आपण लक्षात घेणे अवश्यक तथा अत्यंत गरजेचे आहे! झाडे लावणें, सांभाळणें तथा संवर्धन अर्थात पर्यावर्णाचा विचार करणें जनु हे माझे कामच नाही किंवा ते माझे कर्तव्यच नाही असे आपण समजतो व वागतो, हे चूक आहे.
.
आनखिन एक अति महत्वाची तथा आपल्या जिविताला धोके दायक अशी बाब आहे ती म्हणजे “हवामान प्रदुषण (एअर पोलूशन) आणि जागतिक पृथ्वी तपमानात (ग्लोबल वार्मिंग मध्ये) जिव घेणी वाढ”!
.येणारी परिस्थिती तथा काळ खूपच भयंकर तथा भयानक आहे हे प्रत्येकानी क्षणभर श्वास रोकून विचार करणें गरजेचे आहे. भविष्यात आपल्या प्रेत्येकाच्या पाठीवर प्राण वायूची भली मोठी नळकांडी (O2 CYLENDER) घेऊनच फिरावे तथा वावरावे लागणार आहे! फक्त कल्पना करा !
आपण कोरोना काळात “प्राण वायू” वेळिच न मिळाल्या मुळे अनेकांना मुकलो आहोत.त्याही पेक्षा येणारा भविष्य काळ फार भयंकर असणार आहे! कारण भारतातील बिहार राज्यातील एक गाव अति प्रदुषित तर देशाची राजधानी “दिल्ली” हे शहर “जगात जास्त प्रदुषित” असल्याचं आणि “दिल्ली,अकोला व नांदेड” जगात अति उष्णतेची ( HOT) शहरे म्हणून प्रसिद्धी पावत आहेत.! गोदामाईच्या कडेला, नाभी स्थानी वसलेल्या नांदेड शहरात आठ दिवसानी पाणी मिळते आहे!
याचा आजच गांभिर्याने विचार करणे गरजेचेच नाही तर अगत्याचे आहे ,असे माझे मत आहे.! हे प्रश्न “एक मात्र चळवळीने” सुटू शकतील आणि ती चळवळ म्हणजेच “वसुंधरेचे संवर्धन” म्हणजेच “निसर्गाचे संतुलन तथा संवर्धन” अर्थात “पर्यावर्णाचे संतुलन” ही जागरूकता अंगीकारणें तथा जाणीव पूर्वक सामूहिक प्रयत्नाची पराकाष्टा करणे होय! “वसुंधरेचे” अर्थात “निसर्गाचे संतूलन” तथा “पर्यावर्णाचे संतुलन” यत्किचिंतही ढळू न देणें हे होय!आणि हे आत्ताच शक्य आहे..
त्या साठी सर्वांनींच सामूहिक रित्या,येत्या पावसाळ्यात(जून मध्ये-मृग नक्षत्रात, जाणीव पूर्वक कमी पाण्यावर उगणारी, वाढणारी, टिकणारी,सहसा गैरी तथा मोकाट जणावरे सुध्दा न खाणारी व संवर्धनास सोपी आणि टिकाऊ असी कडू लिंब, जांभूळ, चिंच, सीताफळ, आंबा, वड, पिंपळ,पिंपरी,उंबर, बिबा,पिंप्रण, पळस, कवट, हर्डा,ब्याहाडा, आवळा, रिठा, करंजी,गुलमोहर, अशोका, निलगीरी, बदाम, बहावा,कदंब, गोंदणीं,टेंंभूर्णी आणि सागवान आदि”.या वर्गातील वृक्ष उगण्यास, सांभाळ व संवर्धन करण्यास सोपी- सुलभ असतात. आयुष्यमानही खूप असते.
हि वृक्ष मोठी व दीर्घायू असतात.हवा शुद्ध कररण्यास रात्रंदिवस मदत करतात.हवेत भरपूर प्राण वायू सोडतात.हवेतील कार्बनडाय व कार्बन मोनाॅक्साईड अदि विषारी वायू शोषून घेतात. हवा शूद्धीकरणा बरोबरच जमिनीत पाणी धरून ठेवतात. पाण्याची जमिनीतील पातळी खोल जात असलेली रोकून धरतात. पाऊसही भरपूर पडण्यास आणि जमिनीची धूप धरून ठेवतात.वसुंधरेचे संतूलन, वातावरण संवर्धन अर्थात पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदत होते.माझ्या विष्णूपुरीच्या शिवारातील शेतीत या पैकी बहूतांशी वृक्ष लागवड केलेली आहे.मी माझ्या शेतात फळ झाडे व ईतर झाडे मिळून किमान दहा हजार झाडे(वृक्ष)लागवड केलेली आहे.प्रति वर्षि अजूनही वृक्षा रोपण करतच असतो. आपणही सर्वांनी एका कुटूंबा गणिक दरडोई किमान एक वृक्ष लावणें, सांभाळणे तथा संवर्धन करणें, तेही आत्ताच करणें अगत्याचे आहे!”.तद्वतच “पूर्विची असलेली लहान मोठी का असेनात वृक्ष तोड थांबविणें, हेही तेवढेच महत्वाचे आहे!”
तसेच कुठलेही वन पेटणार नाही याची दक्षता घेणें व पेटलेच तर ते तात्काळ कसे विझवता येईल ही भूमिका कटाक्षतेने बजावणें हेही तेवढेच महत्वाचे ठरते! “एक वृक्ष तोडणें म्हणजे, एक नव्हे अनेक निषापाप मनुष्य वध केल्यारखेच आहे!”. निसर्ग सवंर्धनासाठी तथा संतुलने साठे,वसुंधरेच्या संवर्धने साठी,आजच,आत्ताच,या क्षणीच आपण जागरूक तथा तयार राहिलो तरच येणारा भविष्य काळ आपणास व आपल्या पुढील पिढीस सुखकर राहील!
निसर्ग संवर्धन व सृष्टीचे संतुलन राखण्यासाठी,सुखकर जीवनासाठी, भरपूर पाण्यासाठी, भरपूर प्राणवायू साठी,ईतर सजीवां साठी, जन्मदिवस, लग्न दिवस, पुण्यतिथी तथा वर्षश्राद्धा साठी,निसर्ग प्रेमी, वृक्ष प्रेमी,पक्षी प्रेमी, कवी, साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, डाॅक्टर, इंजिनीयर, वकील,ज्यज्ज, कुठलेही साहेब, पत्रकार, एक सुहृदयी माणूस म्हणून आपण प्रत्येकानी एक वृक्ष शपथ पूर्वक लाऊ या!वसुंधरेला, निसर्गाला अर्थात पर्यावरणाला संतुलित ठेऊ या! येत्या जागतिक पर्यावरण दिवस “पाच जून दिना” निमित्त सर्वानी जिथे जमिन दिसेल तिथे,रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तथा किमान नदीच्या दुतर्फा काठावर तरी आपण सर्व शाळा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंदानी,वृक्षा रोपण करू या व पर्यावरणाचे संवर्धन करू या!आपले व येणार्या भावी पिढ्यांचे भविष्य उज्वल करू या! भविष्यात असाहाय अशा जागतिक तपमान वाढीस रोकूया!पर्यावरण दुषित होण्यास वेळीच रोखू या. हवामान प्रदुषणामुळे आपल्या व आपल्या भावी पिढीच्या पाठीवर संभाव्य प्राण वायूच्या नळकांड्यांचे ओझे टाळू या! अति-अति महत्वाची,लाख मोलाची ,लाखातली गोष्ठ आपण लक्षात ठेऊ या…!
1)फक्त आणि फक्त एवढच करू या..
एखाध्या वेळेस वृक्षा रोपण नाही केले तरी चालेल पण नैसर्गिक रित्या उगवलेली तथा वाढलेली वृक्षं तोडू तरी नका.!
एखाध्या वेळेस आपण कुठली नदी स्वच्छ केली नाही तरी चालेल.नदी प्रवाही असल्याने नैसर्गिक रित्या स्वंय स्वच्छ होते पण किमान तिला घाण करण्याचे तरी टाळा..!
आपण एखाध्या वेळेस शांतता प्रस्थापित करू शकलो नाहित तरी चालेल. पण किमान द्वेश तरी पसरवू नका.!
तुम्ही प्राणी वाचविण्याचा एखाद्या वेळेस प्रयत्न करू शकले नाहित तरी चालेल,पण किमान त्यांची हत्या तरी करू नका! मारू तरी नका.जंगलाला पेटवू तरी नका!जंगल पेटलेच तर त्वरित विझविण्याचा प्रयत्न तरी करा.!
सारांश, आपण निसर्गाला व्यवस्थित करू शकले नाही तरी चालेल पण किमान स्वतः तरी व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न तरी करा.!निसर्ग निर्मित श्रंखला खंडित तरी करू नका.!