मुंबई| माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

राज्यातील कारागृहांच्या बळकटीकरणासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. कारागृहांमधील कैद्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे तसेच त्यांच्यातील गुन्हेगारीला प्रतिबंधासाठी कारागृह व सुधार सेवा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये बंदिवानांच्या कलागुणांना वाव देणे, विशेष माफी, वेतनात वाढ, असे विविध उपक्रम राबविण्यात येत असून शृंखला उपहारगृह, ज्येष्ठ बंदिवानांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे उपक्रम काय आहेत तसेच राज्यातील कारागृहांमध्ये या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे. याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून श्री. गुप्ता यांनी माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. 19, शुक्रवार दि. 20 आणि शनिवार दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version