नागपूर| नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. कारखान्यातील अधिकाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजारगाव दुर्घटना स्थळाला भेट
नागपूर जवळच्या बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या ठिकाणी आज झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उपस्थित कुटुंबीयांशी बोलताना या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. कंपनीकडून सुद्धा 20 लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version