उमरखेड, अरविंद ओझलवार| लोकसभा निवडणुकीची तयारी करीत असताना आज उमरखेड उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण सुरू असताना एका अभियंत्याने चक्क दारू पिऊन प्रशिक्षणा दरम्यान गोंधळ निर्माण करीत उदंड माजविल्याची घटना दुपारी तीन वाजता दरम्यान येथील शासकीय धान्य गोदाम क्रमांक दोन च्या सभागृहात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे .

मागील पंधरा दिवसापासून निवडणूक विभाग हा लोकसभेच्या तयारीला लागला आहे . यापूर्वी निवडणूक विभागाने वेळोवेळी प्रशिक्षण घेतले आहे . आज रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान येथील शासकीय धान्य क्रमांक दोन च्या गोडाऊनमध्ये प्रशिक्षण सुरू असताना इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या नोंदी कशा प्रकारच्या ठेवाव्यात याचे कार्य प्रशिक्षण सुरू होते . हा कार्यक्रम चालू असताना महागाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता माधव गोविंद उघडे यांनी दारू पिऊन दारूच्या नशेत एकच गोंधळ सुरू केला . अतिशय महत्त्वाच्या या कार्यात व्यतय आणून त्यांनी निवडणूक संबंधाने नेमून दिलेल्या टेबल क्रमांक 27 वरील काम करण्याचे निर्देश पार पाडले नाही .

दारूच्या नशेत त्यांनी काम करण्यास चक्क नकार दिला व ईव्हीएम मशीन व व्हीव्हिपॅट मशीन चुकीच्या पद्धतीने सील केले . तेव्हा त्याच्या टेबलवरील शेजारी इतर कर्मचाऱ्यांनी ही बाब उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या लक्षात आणून दिली . केलेली चूक गंभीर असून दुरुस्ती करण्याच्या सूचना यावेळी सदर अभियंता यांना देण्यात आल्या . मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता व चूक दुरुस्ती करीत नाही म्हणून गोंधळ घालून हातातील कागदपत्रे भिरकावून दिली . यावरून नायब तहसीलदार वैभव पवार यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरून सदर अभियंता माधव उघडे यांचे मेडिकल केले असून 134 लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 व दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी अशी तक्रार करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे .

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version