माहूर| तालुक्यातील लांजी येथे आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन सरपंच मारोती रेकुलवार यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश माचेवार, यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.
माहूर तालुक्यातील लांजी गावात आरोग्य उपकेंद्र नसल्याने आरोग्याच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने या भागात असलेल्या रुग्णांना आरोग्य विषयक सुविधा देणे गैरसोयीचे होत होते. गावातील लोकप्रतिनिधींनी आरोग्य सुविधेचा प्रश्न सोडविण्यासाठी गावात आरोग्य केंद्र होण्यासाठी पाठपुरावा केला होता.लांजी गावातील अधिकांश वर्ग गरीब असून गावातील नागरिकांना महिला, गरोदर मातांना. बाळाला, आरोग्य सेवा गावातच मिळावी.
यासाठी लांजी चे सरपंच मारोती रेकुलवार आग्रही होते,दिनांक १४ जुलै रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश माचेवार,माजी सरपंच बालाजी पवार, तंटा मुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड, आष्टा येथील वैद्यकीय अधिकारी संदेश राठोड, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी कळंबे,आरोग्य सेवक अनिकेत पिलवंड,रामेश्वर बोरकर,ग्रामसेवक साधना तावडे, यांच्या उपस्थित आरोग्य उपकेंद्राचे सरपंच मारोती रेकुलवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.या वेळी आरोग्य कर्मचारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थितीत होते.