हदगाव,शे चांदपाशा। हिगोली लोकसभा मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत कोसो दुर असले तरी माञ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माञ चर्चेला उत आला आहे. त्याला कारण ही तसेच आहे या हिगोली लोकसभा मतदार संघावर माञ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे .माजी मुख्यंमञी आशोकराव चव्हाण सह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदें यांचे पुर्ण लक्ष दिसुन येत आहे.

शिवसेना (ठाकरे गटाकडून माजी आ. नागेश पाटील आष्टीकर व काँग्रेस कडुन माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण यानी डाँ अंकुश देवसरकर यांच्या नावचा आग्रह धरला आहे. तर राज्याचे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडुन विद्यमान खा. हेंमत पाटील यांचे नाव चर्चेत आहे त्या अनुंषगाने हिगोली जिल्ह्यात याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदें यांची सभा घेण्याचे ही निश्चितच झाल्याची माहीती मिळत आहे. हिगोली लोकसभा मध्ये हिगोंली जिल्ह्यातील 3 नादेड जिल्ह्यातील 2 व यवतमाळ जिल्ह्यातील 1 असे एकुण 6 विधानसभा क्षेत्र आहेतआता पर्यत 19 77 ला चद्रकांन्त पाटील. (जनता पार्टी ) 1980 स्व.उत्तमराव राठोड काँग्रेस (तीन वेळा)1991 विलास गुडेवार (शिवसेना)1996अँड शिवाजी माने 1998 सुर्यकांन्ता पाटील (काँग्रेस ) 2009 सुभाष वानखेडे (शिवसेना) 2014 स्व. राजीव सातव (काँग्रेस ) 2019 हेंमत पाटील सध्याचे शिवसेनेचे खा हेंमतपाटील यांनी मुख्यमंत्री शिदे गटात शामिल झालेले आहे.

अणखी विशेष म्हणजे 2019 ला हिगोली लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे हेमत पाटील यांनी बाजी मारली होती त्यांनी काँग्रेस चे खा.सुभाष वानखेडे त्यावेळी यांचा परभाव झाला होता अणखी विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभाच्या निवडणूकीत केवळ 1632 मतांनी परभाव स्वीकारावा लागल होत हे उल्लेखनीय आहे ..

लोकसभा ! महाविकास आघाडीची ‘ एकजूट ‘अवश्यक …!
लोकसभा निवडणूकीची मोर्चबांधणी अंतिम टप्प्यात आलेली असुन ठाकरे गटाने आपला लोकसभेचा उमेदवार जाहीर केला आहे . यामुळे महाविकास आघाडीला लोक- सभेची जागा राखण्यासाठी आघाडी सर्वपक्षाची ‘एकता ‘ठेवावी लागणार आहे या लोकसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीकडे पुढे पेंच दिसत आहे ..

भाजपा ही तयारीत….!
हिगोली लोकसभा… मतदार संघावर भाजपा ही लक्ष ठेवून आहे या या मध्ये रामदास पाटील सुमठाणकर .डाँ. श्रीकांन्त पाटील व रामराव वडकुते ही टीम भाजपाने तयारच ठेवलेली आहे. प्रामुख्याने नांवे असुन या हिगोली लोकसभा मतदार संघावर भाजपाचे उपमुख्यमंञी देवेद्र फडणवीस हे विशेष लक्ष ठेवून असल्याचे दिसुन येत आहे कारण हदगाव विधानसभाक्षेञांत भाजपाने ग्रामीण विविध कार्यक्रम बैठका द्वरे भागात चांगलाच जम बसविलेल आहे उल्लेखनीय आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version